घरमुंबईगणपती विसर्जनादरम्यान भांडूपेश्वर तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

गणपती विसर्जनादरम्यान भांडूपेश्वर तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

Subscribe

भांडूपमध्ये गणपती विसर्जनादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. भांडूपच्या भांडूपेश्वर तलावामध्ये ही घटना घडली आहे. गणेशभक्तांनी तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा मृत्यू झाला.

दहा दिवसाच्या पाहुणचारानंतर गणपतीबाप्पाचे रविवारी विसर्जन करण्यात आले. या गणेशविसर्जनला मुंबईमध्ये गालबोट लागले आहे. भांडूपमध्ये गणेश विसर्जना दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. भांडूपच्या भांडूपेश्वर तलावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणपतींचे विसर्जन होत असते. यंदाच्या वर्षी देखील याठिकाणी अनेक गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. मात्र या विसर्जना दरम्यान एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

तलावात बुडतानाचा व्हिडिओ समोर आला

यज्ञेश मळेकर असे या मृत तरुणाचे नाव आहे. यज्ञेश इतर सहकाऱ्यांसह रात्री 2 च्या दरम्यान तलावात गणपती विसर्जनासाठी उतरला होता. गणपती विसर्जन करण्यासाठी तराफावरुन तलावाच्या मध्यभागी जात असताना अचानक यज्ञेश तलावात पडला. १४ फुटांपेक्षा खोल असलेल्या या तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला. हा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. स्थानिकांनी त्याला बाहेर काढले आणि मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात उपचारास दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या घटनेनंतर यज्ञेश परिसरामध्ये राहायला होता त्याठिकाणी शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

गणपती विसर्जनादरम्यान ४४ जण जखमी

कांदिवली चारकोप येथे गणपती विसर्जना दरम्यान क्रेन पडून १७ जण जखमी झाले. या जखमींवर एस एम टी पाटील स्टाफ नर्स ऑस्कर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पवईमध्ये गणपती विसर्जना दरम्यान क्रेनमधून गणपती बाप्पाची मूर्ती अंगावर पडून २ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लालबागाच्या राज्याच्या विसर्जना दरम्यान बोट उलटून ५ जण जखमी झाले. बोट उलटून जखमी झालेल्यांवर नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे गणपती विसर्जना दरम्यान वेगवेगळ्या कारणाने २० जण जखमी झाले आहेत. तर पवईमध्ये एका गणेशभक्ताचा विसर्जनादरम्यान हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -