घरमनोरंजनबहुरूपी अभिनेता आमिर खानचा 'फिरंगी' लुक

बहुरूपी अभिनेता आमिर खानचा ‘फिरंगी’ लुक

Subscribe

बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान नेहमीच आपल्या लुकसोबत नवनवे प्रयोग करत असतो. आज त्याच्या आगामी 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शीत झाला आहे.

बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान नेहमीच आपल्या लुकसोबत नवनवे प्रयोग करत असतो. आज त्याच्या आगामी ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शीत झाला आहे. आमिर या चित्रपटात ‘फिरंगी’ ही व्यक्तीरेखा साकारत असून यामधील त्याचा लुकही हटके आहे. सोनेरी केस, लाल चष्मा, गोल टोपी आणि इंग्रजांचा हिरवा जॅकेट या लुकमध्ये आमिरने सलाम ठोकला आहे. ‘इस ठगसे बचने के रेहना’, अशी टॅगलाईन या पोस्टरला आमिरची सहअभिनेत्री फातिमा सना शेखने तिच्या ट्विटर हँडलवर दिली आहे.

- Advertisement -

बिग बींच्या पोस्टरने सुरुवात

या चित्रपटाचा फस्ट लुक सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर प्रथम बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांचा चित्रपटातील लुक दाखवण्यात आला. चित्रपटात बिग बी ‘खुदाबक्श’ ही व्यक्तीरेखा साकारत असून तोफेवर पाय आणि हातात तलवार घेऊन पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांचा अँग्री लुक प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. त्यानंतर अभिनेत्री फातिमा सना शेख हिचा लुक प्रसिद्ध करण्यात आला असून या चित्रपटात ती ‘झाफिरा’ची भूमिका साकारत आहे. परदेशी कलाकार लॉयड ओवेन हे ‘जॉन क्लाईव्ह’ ही भूमिका साकारत असून इंग्रजांच्या काळातील हुकुमशहाच्या अवतारात तो दिसत आहे. चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री कतरीना कैफ हिचा सिझलिंग लुकदेखील प्रसिद्ध झाला असून या चित्रपटात ती ‘सुरैय्या’ ही भूमिका साकारत आहे. अखेर आज आमिरचा घोड्यावर स्वार फिरंगीचा लुक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

- Advertisement -

चित्रपटाच्या ट्रेलरची उस्तुकता

‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार महानायक अमिताभ बच्चन आणि मि. परफेक्शनिस्ट आमिर पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. विशेष म्हणजे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. यश राज फिल्मसची निर्मिती असलेल्या या चित्रपटात आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासह कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्याही प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहे. या बिग बजेट आणि मेगा स्टारर चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज केल्यानंतर या कलाकारांचेही एकएक करून लुक्स यशराजच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आले. येत्या दिवाळीत म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शीत होणार असून यामधील सर्वच कलाकारांच्या लुक्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. गेल्या आठवड्यात १७ सप्टेंबर रोजी या चित्रपटाचा लोगो प्रसिद्ध करण्यात आला असून या चित्रपटाचा ट्रेलर २७ सप्टेंबर म्हणजेच याश चोपडा यांच्या जयंतीनिमित्त रिलीज केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

thug of histustan
ठग्ज ऑफ हिंदुस्तान

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -