घरCORONA UPDATECoronaVirus : नगरसेवकांसह पोलीस, महापालिका सफाई कामगारांची ‘फिव्हर’ तपासणी

CoronaVirus : नगरसेवकांसह पोलीस, महापालिका सफाई कामगारांची ‘फिव्हर’ तपासणी

Subscribe

फिव्हर क्लिनिक’मध्ये तपासणीमध्ये यापैकी कुणाची लक्षणे आढळून आल्यास त्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, असेही निर्देश दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत सामाजिक कार्य करणाऱ्या नगरसेवकांसह, पोलीस कर्मचारी, वाहन चालक, महापालिकेच्या सफाई कामगारांसह चतुर्थ व तृत्तीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांची फिव्हर तपासणी करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे. या ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये तपासणीमध्ये यापैकी कुणाची लक्षणे आढळून आल्यास त्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, असेही निर्देश दिले आहेत.

मुंबईतील ज्या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येतात. त्याठिकाणी महापालिकेच्यावतीने ‘फिव्हर क्लिनिक’च्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात येते. या फिव्हर क्लिनिकद्वारे काही प्रमाणात कोरोनाचे रुग्ण शोधण्यास महापालिकेला सोपे जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या कालावधीत अनेक नगरसेवक रस्त्यांवर उतरुन काम करत आहे. सार्वजनिक जीवनात काम करता लोकप्रतिनिधी आणि आपल्या कुटुंबाच्या प्रकृतीकडे लक्ष देत नाही. त्यामुळे विभागातील ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये जावून नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांसह कार्यकर्त्यांची तपासणी करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. या तपासणीमध्ये ज्या नगरसेवकांमध्ये किंवा व्यक्तींमध्ये लक्षणे आढळून आल्यास त्यांचे स्वॅब घेतले जावेत, असेही निर्देश सर्व प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.

- Advertisement -

केवळ नगरसेवक यांचीच तपासणी करण्याचे निर्देश नाही तर पोलिस, वाहन चालक आणि महापालिकेचे तृत्तीय व चतुश्री श्रेणीतील कामगार, कर्मचाऱ्यांची फिव्हर तपासणी करण्याचेही निर्देश दिल्याचे काकाणी यांनी स्पष्ट केले. मुंबईत शनिवारी आणि रविवारी अशा दोन दिवशी वाहन चालकांसाठी अशाप्रकारच्या तपासणीसाठी फिव्हर कॅम्प लावले जाणार आहे. वाहन चालक आपल्या अधिकाऱ्यांसोबत तसेच इतर कर्मचाऱ्यांसह फिरत असतात. त्यामुळे त्यांची तपासणी केली जाणार आहे. तर याशिवाय पोलीस कर्मचाऱ्यांचीही तपासणी केली जाणार आहे. याबरोबरच घनकचरा, आरोग्य विभागातील कामगार कर्मचाऱ्यांचीही ‘फिव्हर टेस्ट’ केली जाणार आहे. सफाई कामगारांची त्या त्या चौक्यांमध्ये तर आरोग्य खात्यातील कामगार, कर्मचाऱ्यांची त्या त्या रुग्णालयात तपासणी केली जावी, असेही निर्देश दिल्याचे काकाणी यांनी स्पष्ट केले. या तपासणीमध्ये आवश्यकता भासल्यास नगरसेवकांसह पोलीस, वाहन चालक आणि महापालिकेच्या चतुर्थ व तृत्तीय श्रेणी कामगार, कर्मचारी यांचीही तपासणी करून आवश्यकता भासल्यास त्यांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश  दिले आहे. मुंबईत पत्रकारांची कोरोना चाचणी घेतल्यानंतर एकाच वेळी ५० पत्रकार पॉझिटिव्ह आढळून आले होते. हे लक्षात घेता प्रशासनाने नगरसेवकांची फिव्हर टेस्ट घेत आवश्यकता भासल्यास कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -