घरताज्या घडामोडीदक्षता घ्या, येत्या सहा दिवसांत हिट वेव्ह येण्याचा अंदाज

दक्षता घ्या, येत्या सहा दिवसांत हिट वेव्ह येण्याचा अंदाज

Subscribe

विदर्भ, मराठवाडा, गुजरात मध्य प्रदेश, तेंलगणा, राजस्थान, सौराष्ट्र, कच्छ, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र या भागात आज कमाल तापमानाची नोंद ही ४० डिग्री सेल्सिअसहून अधिक होती. महाराष्ट्रात ३० एप्रिलला सर्वाधिक तापमानाची नोंद ही ४४.३ डिग्री सेल्सिअस अशी अकोला (विदर्भ) येथे नोंदविण्यात आली. इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट (आयएमडी)ने देशात अनेक ठिकाणी आगामी पाच दिवसांसाठी हिट वेव्हचा इशारा जाहीर दिला आहे.

महाराष्ट्रात काही ठिकाणी म्हणजे मध्य महाराष्ट्र, विदर्भ याठिकाणी हिट वेव्हचा एलर्ट देण्यात आला आहे. ज्या भागात ४० डिग्री सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद होते, अशा भागांसाठी आयएमडीकडून हिट वेव्हचा अलर्ट दिला जातो. हिट वेव्हसाठी समुद्र किनार पट्टीच्या भागासाठी कमाल ३७ डिग्री सेल्सिअसचा निकष आहे. तर डोंगराळ भागासाठी हा निकष ३० डिग्री सेल्सिअस इतका आहे. जेव्हा ४५ डिग्री पेक्षा अधिक तापमानाचा अंदाज असतो, तेव्हा हिट वेव्हचा रेड एलर्ट दिला जातो.

- Advertisement -

आगामी सहा दिवसांमध्ये देशात अनेक ठिकाणांसाठी हा अलर्ट देण्यात आला आहे. सरासरीपेक्षा अधिक तापमान या काळात असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या दिवसांत हिट वेव्हची तीव्रता अधिक वाढू शकते, असा अंदाज आयएमडी मार्फत वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही हिट वेव्हचा परिणाम जाणवणार आहे. या हिट वेव्हचा परिणाम म्हणजे अति उष्णतेमुळे आजारपण तसेच हिट स्ट्रोकचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे या काळात योग्य ती दक्षता घेण्याचा इशारा आयएमडीमार्फत देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -