घरमुंबईलोअर परळ पुलावरुन 'सेना- मनसे'चा राडा

लोअर परळ पुलावरुन ‘सेना- मनसे’चा राडा

Subscribe

लोअर परळचा पूल पूर्णत: वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पण हा पूल पादचाऱ्यांसाठी सुरु करण्यात यावा, अशी मागणी सेना आणि मनसेकडून करण्यात आली. पण आता हा पूल पादचाऱ्यांसाठी सुरु करण्याच्या श्रेयावरुन सेना- मनसेमध्ये आज तुफान राडा झाला.

लोअर परळ पुलाची दूरवस्था पाहता हा रविवार रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पण आता हा पूल पादचाऱ्यांसाठी खुला करावा अशी मागणी करण्यात आली. आता या मागणीवरुन श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. सेना- मनसेमध्ये आज लोअर परळ पुलावरच राडा झाला असून आता या दोन्ही पक्षाने आरोप-प्रत्यारोप केले आहेत.

MNS-SHIVSENA
श्रेयवादावरुन सेना-मनसेत लोअर परळला राडा झाला

नेमकं प्रकरण काय?

लोअर परळचा पूल पूर्णत: वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पण हा पूल पादचाऱ्यांसाठी सुरु करण्यात यावा, अशी मागणी सेना आणि मनसेकडून करण्यात आली. पण आता हा पूल पादचाऱ्यांसाठी सुरु करण्याच्या श्रेयावरुन सेना- मनसेमध्ये आज तुफान राडा झाला. सेना- मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. आता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून यावेळी शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी पादचारी वाहतुकीसाठी उड्डाणपुल लवकरच सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,पण मनसे अडथळा आणत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -

पुलाचे झाले ऑडिट

अंधेरीतील गोखले पूलाचा काही भाग कोसळल्यानंतर मुंबईतील पुलांचे ऑडिट करण्यात आले. यात लोअर परळच्या पूलाची दुरवस्था झाल्याचे समोर आले. त्यामुळे हा पूल तातडीन बंद करण्यात आला. पण या ठिकाणी असलेल्या ऑफिसेसची संख्या पाहताय किमान कर्मचाऱ्यांना या पुलावरुन पायी चालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

अशी वळवली वाहतूक

नागरिकांचे हाल टाळण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी हा पूल बंद केल्यानंतर या पुलाशी जोडलेला महादेव पालव मार्ग म्हणजेच करी रोड रेल्वे स्थानकासमोरील पुल लालबागच्या दिशेने आणि ना. म. जोशी मार्ग हा चिंचपोकळीच्या दिशेने सुरु ठेवण्यात येणार आहे. फिनिक्स मॉल आणि कमला मिल कंपाऊंडसमोरील रस्ता वाहतुकीसाठी खुला असेल प्रभादेवी रेल्वे स्थानकापासून गणपतराव कदम मार्गे वरळी नाका हा मार्ग सुरूच असेल अशी माहिती दुधे यांनी दिली. करी रोड सिग्नलपासून ते वडाचा नाका (दीपक सिनेमाकडे जाणार मार्ग) आणि वरळीच्या दिशेने जाणार जोड पूल मंगळवारपासून वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -