घरमुंबईमॉडेलशी अश्लील संभाषण करणार्‍या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

मॉडेलशी अश्लील संभाषण करणार्‍या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

जोगेश्वरी येथे राहणार्‍या एका 30 वर्षांच्या मॉडेल तरुणीशी मोबाईलवरुन अश्लील संभाषण केल्याप्रकरणी राहुल नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे. राहुलने तक्रारदार तरुणीला दोन वेळा आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन कॉल करुन तिच्याशी अश्लील संभाषण केल्याचे पोलिसांनी सांगितले.

30 वर्षांची तक्रारदार तरुणी ही जोगेश्वरीतील ओशिवरा परिसरातील एका पॉश अपार्टमेंटमध्ये राहते. मॉडेल असलेली ही तरुणी सध्या अभिनय क्षेत्रात तिचे करिअर करीत आहे. तिचे आई-वडिल उत्तर प्रदेशातील मथुरा शहरात राहतात तर ती तिच्या बहिणीसोबत तिथे राहते. 30 नोव्हेंबरला ती रात्री काम करुन घरी आली होती. रात्री दोन वाजता ती झोपली होती, यावेळी तिच्या मोबाईलवरुन एक आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरुन कॉल आला होता.

- Advertisement -

यावेळी समोरील व्यक्तीने तिच्याशी अक्षरशा अश्लील भाषेत संभाषण करुन तिच्या शारीरिक सुखाची मागणी केली होती. या प्रकाराने तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने फोन कट केला होता. त्यानंतर दुसर्‍या दिवशी तिला पुन्हा दुसर्‍या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन कॉल आला होता. यावेळी राहुल नाव सांगणार्‍या व्यक्तीने पुन्हा तिच्याशी अश्लील संभाषण केले होते. या दोन्ही घटनेनंतर तिने तिच्या काही मित्र-मैत्रिणींना ही माहिती दिली. त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून राहुल या व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -