Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई नवनीत राणांच्या बॉडीगार्डवर गुन्हा दाखल, लिलावतीतील फोटो सेशनप्रकरणी वांद्रे पोलिसांची कारवाई

नवनीत राणांच्या बॉडीगार्डवर गुन्हा दाखल, लिलावतीतील फोटो सेशनप्रकरणी वांद्रे पोलिसांची कारवाई

Subscribe

एमआरआय विभागात नवनीत राणा यांच्यासोबत त्यांचा अंगरक्षक आणि एक व्यक्ती गेली होती. यावेळी एमआरआय मशीनजवळ नवनीत राणा यांचे मोबाइलवर फोटो काढून ते व्हायरल करण्यात आले होते.

जामिनावर सुटका झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना मानेच्या त्रासामुळे त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी एमआरआय करतानाचे नवनीत राणा यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. याची दखल घेत वांद्रे पोलिसांनी नवनीत राणा यांच्या बॉडीगार्डवर गुन्हा दाखल केला आहे.

एमआरआय विभागात नवनीत राणा यांच्यासोबत त्यांचा अंगरक्षक आणि एक व्यक्ती गेली होती. यावेळी एमआरआय मशीनजवळ नवनीत राणा यांचे मोबाइलवर फोटो काढून ते व्हायरल करण्यात आले होते. सीसीटीव्ही फूटेजमधून राणा यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीनींच फोटो काढल्याचे समोर आले.

- Advertisement -

एमआरआय करताना राणा यांचे फोटो काढून व्हायरल करण्यात आल्याने व त्यावेळी रूग्णालय कर्मचारी, प्रशासनाने त्यांना मदत केल्याचे निदर्शनास आल्याने शिवसेना आक्रमक झाली. शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे व माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक अनिल कोकीळ आदींनी लीलावती रूग्णालयात धडक दिली होती. त्यांनी प्रशासन, संबंधित डॉक्टर, कर्मचारी, व्यवस्थापन यांना एकत्रित करून त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करून जाब विचारला.  मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने शिवसेना नेते अधिकच आक्रमक झाले. तर त्यानंतर मुंबई महापालिकेने लीलावती रुग्णालयाला एक नोटीस पाठवून त्यांच्याकडे ४८ तासात उत्तर देण्याबाबत फर्मावले होते.

दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. एमआरआय रुमधील उपस्थितांना बोलवण्याची मागणी करत त्यांनी एमआरआय खरोखर केला का? असा सवाल उपस्थित केला. त्यावर रुग्णालयाचे सीईओ आणि डॉक्टरांनी हो अस उत्तर दिलं. त्यावेळी राहुल कानाल यांनी या सगळ्याचा पुरावा देण्याची मागणी करत एमआयआर झालंच नाही हे सिद्ध केलं तर? असा सवाल उपस्थित केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -