घरमुंबईआगीचे सत्र सुरुच; पनवेलच्या वैदू नगर झोपडपट्टीला भीषण आग

आगीचे सत्र सुरुच; पनवेलच्या वैदू नगर झोपडपट्टीला भीषण आग

Subscribe

मुंबईमध्ये आगीचे सत्र सुरुच. नवी मुंबईच्या पनवेल येथील वैदू नगर झोपडपट्टीला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.

मुंबईमध्ये काही केल्या आगीचे सत्र कमी होताना दिसत नाही. आठवड्याभरापूर्वी कामगार हॉस्पिटलच्या आगीचा शोक अजूनही धगधगत असताना देखील पुन्हा पुन्हा आगीच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी लोअर परळच्या एका बांधकाम इमारतीला भीषण आग लागली होती. तर त्याच्या आदल्यादिवशी जुईनगर रेल्वे स्थानकाला आग लागली आहे. या सगळ्या घटना ताज्या असतानाच सोमवारी सकाळी नवी मुंबईच्या पनवेल येथील वैदू नगर परिसरात पुन्हा आगीची घटना घडली आहे. या आगीमध्ये अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

आज सकाळी (सोमवारी) सव्वा तीनच्या सुमारास पनवेलच्या वैदू नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपडपट्या जळून खाक झाल्या. कित्येक गरिब कुटुंबांचे संसार जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पनवेल महानगरपालिकेसह कळंबोली, खारघर आणि वाशी या अग्नीशमन दलाचे बंब या ठिकाणी आले होते. ही आग फार भीषण होती. त्यामुळे अल्पावधीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाचे जवान ही आग शमवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होते. अखेर, आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. दरम्यान, या आगीमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. त्याचा तपास लावत असल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल जाधव यांनी दिली आहे. सोमवारी सकाळी राज्यात विविध ठिकणी आगीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. भिवंडीत एका कपड्यांच्या कंपनीला भीषण सकाळी आग लागली. त्याचबरोबर शिर्डी येथील एका इमारतीला देखील भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

- Advertisement -

हेही वाचा – भिवंडीत उजागर डाईंग कंपनीला भीषण आग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -