घरमुंबईअखेर कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा होणार कार्यान्वित!

अखेर कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा होणार कार्यान्वित!

Subscribe

कस्तूरबा हॉस्पिटलमध्ये अखेर अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

कस्तूरबा हॉस्पिटल हे पालिकेच्या विशेष हॉस्पिटलमधील एक असताना, या हॉस्पिटलमध्ये सक्षम अग्निशमन यंत्रणा नसल्याचे उघड झाले आहे. पालिकेनेच या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्याची घोषणा करून, आपला झोपी गेलेला कारभार चव्हाट्यावर आणला आहे. या हॉस्पिटलमध्ये तब्बल ३ कोटी ५४ लाख रूपये खर्च करून अग्निशमन यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

पालिकेचा झोपी गेलेला कारभार चव्हाट्यावर

चिंचपोकळी साने गुरूजी मार्ग आर्थर रोड जेल जवळ पालिकेचे कस्तूरबा हॉस्पिटल असून येथे २४ तास रूग्सेवा सुरू असते. साथीचे हॉस्पिटल म्हणून ओळखल्या जाणार्‍या या हॉस्पिटलमध्ये साथीचे रोग, खोकला आणि श्‍वसनाचे रोग यासारख्या आजाराच्या रूग्णांवर उपचार करण्यात येतात. तसेच इबोला, एच वन, एन वन आणि एसएआरएस (सार्स) आदी संसर्गजन्य रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये विशेष सुविधा आहे. परंतु सध्यस्थितीत आपत्ती व्यवस्थापन करण्याकरिता आवश्यक सुसज्ज अग्निशमन यंत्रणा नाही. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत अग्निशमन यंत्रणा उभारण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेच्या यात्रिंकी आणि विद्युत विभागाने स्थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर केला आहे. ही यंत्रणा येणार्‍या आठ महिन्यात उभारण्यात येणार असल्यामुळे कस्तूरबा हॉस्पिटल आपत्तीचा सामना करण्यास सक्षम होणार आहे.

- Advertisement -

पालिकेने कस्तूरबा हॉस्पिटलमध्ये अद्ययावत अग्निशमन यंत्रणा बसवण्याचा घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. पण गेली अनेक वर्ष या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होणारे रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक पालिकेने रामभरोसे सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. अग्निशमन यंत्रणा नसलेल्या गृहनिर्माण सोसायटी आणि व्यापारी संकूलांना दंडात्मक कारवाई करणारी पालिका आपल्या चुकीची कोणती किंमत मोजणार, असा सवाल नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे या यंत्रणे उभारण्याच्या प्रस्तावावरून स्थायी समितीत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -