घरमनोरंजनBig Boss Marathi 2: पराग-रूपालीमध्ये नेमकं काय सुरू आहे?

Big Boss Marathi 2: पराग-रूपालीमध्ये नेमकं काय सुरू आहे?

Subscribe

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये माधव आणि अभिजीत बिचुकले यांची चांगली मैत्री आहे. तर आज माधव आणि बिचुकलेंमध्ये एक संभाषण होताना दिसणार आहे, जिथे माधव म्हणतो आहे, तुम्ही सगळे माझी बाहेर जाण्याची वाट बघत आहात, मी इथे वाट बघतो आहे तुम्हाला बाहेर पाठविण्याची हेच करतायना तुम्ही ? त्यावर बिचुकले म्हणाले १०० टक्के. दिगंबर नाईक तिथे येताच या दोघांनी कारण दिले आज आमचा performance आहे आणि त्यानंतर माधवने हेच संवाद हिंदीमध्ये कसे म्हणायचे हे अभिजीत बिचुकले यांना सांगितले. आता हा नक्की कुठल्या टास्कचा भाग आहे असणार आहे का काही वेगळे हे आजच्या भागामध्ये कळेलच.

- Advertisement -

शिवानी बिचुकलेंना शिकवणार झाडू मारायला ?

पुन्हाएकदा शिवानी सुर्वे अभिजीत बिचुकले यांची शाळा घेताना दिसणार आहे. त्याचे असे झाले कि, शिवने कॅप्टन झाल्यावर घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी सदस्यांना वेगवेगळ्या टीम्स मध्ये टाकले आणि त्यामुळे अभिजीत बिचुकले आणि शिवानी सुर्वे हे एका टीममध्ये आले आणि बिचुकले यांना घरच्या कामाची फारशी सवय नाही आणि त्यांना ते जमत देखील नाही याचा अंदाज शिवानीला आला आहे शिवानीने बिचुकले यांना सांगितले “मी रीझाईन करेन या कामामधून” त्यावरून बिचुकले यांनी मजेदार प्रतिक्रिया मारायला सुरुवात केली तर शिवानीने शिवला सांगितले “मी जेवणाच्या टीममध्ये जाते” असं कोण झाडू मारतं ? हा प्रश्न शिवानीला पडला आहे. बिग बॉसच्या घरात आलं कि प्रत्येक कामामध्ये सदस्यांना मदत करावी लागते आणि आता शिवानी बिचुकले यांना झाडू कसा मारायचा हे शिकवणार का ? हे बघणे गंमतीशीर असणार आहे याआधी तिने बिचुकलेंना त्यांचे कपडे आणि जागा कशी साफ ठेवावी हे शिकवले होते.

- Advertisement -

किशोरी शहाणे- पराग कोणाबद्दल करत आहेत गॉसिप ?

चोर बाजार हा टास्क सध्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु आहे. या टास्कमध्ये सदस्यांच्या बऱ्याच गोष्टी चोर टीमचे सदस्य चोरत आहेत आणि यामध्येच रुपालीचा मेकअप कीट विरुध्द चोर बनलेल्या टीमने घेतला. पराग यावरूनच किशोरी शहाणे यांच्याशी गप्पा मारताना मजेत बोलताना म्हणाला कि, लोक २ तास ३७ मिनिट मेकअप करत आहेत तर किशोरी ताईनी रुपालीची बाजू घेत म्हणाल्या बिचारीचा मेकअप कीट चोरला आहे तरी सांभाळून घेते आहे. असं नाही हा बोलायच. तर पराग लगेच त्यावर म्हणाला, “हे आपल्यातच राहुदे तिला नका सांगू मी असो बोलो नाही तर माझी वाट लागेल” तर परागला चिडवीण्यासाठी किशोरी ताई म्हणाल्या मी वेळेला याचा उपोग करणार .हे संभाषण इथेच थांबले नाही यावर पराग म्हणाला. मी प्रयत्न करतो आहे करू दे .आता कसला प्रयत्न पराग करतो आहे ? हे त्यालाच माहिती यावर किशोरी ताई म्हणाल्या “डाळ शिजते आहे का ? किशोरी ताईनी परागची या गोष्टीवरून बरीच मजा घेतली. आता नक्की कोणामध्ये डाळ शिजते आहे ? इथे काय सुरु आहे हे आजच्या भागामध्ये कळेलच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -