घरमहाराष्ट्रअहमदनगरमध्ये बिबट्याचा हल्ला; चिमुकल्यासह तीन जण जखमी

अहमदनगरमध्ये बिबट्याचा हल्ला; चिमुकल्यासह तीन जण जखमी

Subscribe

अहमदनगरमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अडीच वर्षाच्या चिमुरड्यासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर शिवारात शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने चिमुकल्यासह तीनजणांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात अडीच वर्षांच्या बालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाली ही घटना घडली. या घटनेत कृष्णा वाल्मिक गायकवाड (वयअडीच वर्षे) आणि संजय जगन भडांगे (४०) हे गंभीर जखमी झाले असून दोन इतर दोन वनमजुरांची नावे समजू शकली नाहीत.

नेमके काय घडले?

संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील गायकवाड वस्ती येथे सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कृष्णा हा चिमुरडा घराच्या अंगणात खेळत असताना पाठीमागून आलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या मानेला चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. घरच्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. त्यांनतर जवळच असलेल्या जांभळीचा मळा येथे याच बिबट्याने संजय भडांगे यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्याला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या संजय यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेताच बिबट्याने तेथूनही पळ काढला. जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वाचवण्यासाठी गेलेल्या वनमजुरांवरही बिबट्याने हल्ला केला असून वनमजुर देखील गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – बदलापूर परिसरात बिबट्याचा वावर

हेही वाचा – बिबट्याच्या हल्ल्यात ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -