घरमुंबईवडाळ्यात टँकर उलटल्याने अग्नितांडव; चालकाचा मृत्यू

वडाळ्यात टँकर उलटल्याने अग्नितांडव; चालकाचा मृत्यू

Subscribe

वडाळा येथे काल रात्री भररस्त्यात अग्नितांडव पाहायला मिळाले. मिथेनॉल घेऊन जात असलेल्या टँकरचा अपघात झाल्यामुळे ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. काल रात्री १०. ४५ मिनिटांनी वडाळ्यातला भक्ती पार्क परिसरात आयमॅक्स सिनेमाजवळ हा टँकर उलटला होता. टँकर उलटल्यानंतर टायर फुटल्याने स्फोट होऊन टँकरला आग लागली आणि टँकरमध्ये असलेल्या ऑईलने पेट घेतल्यानंतर आगीचा भडका उडाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशीरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र या आगीत होरपळून चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे आजुबाजुच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

- Advertisement -

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -