घरहिवाळी अधिवेशन २०१८नर्गिस दत्त नगरमध्ये दहा वर्षात ४९ हजार वेळा लागली आग

नर्गिस दत्त नगरमध्ये दहा वर्षात ४९ हजार वेळा लागली आग

Subscribe

वांद्राच्या नर्गिस दत्त नगर येथील झोपड्यांमध्ये गेल्या दहा वर्षात ४९ हजार वेळा आग लागली आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांंनी सोमवारी अधिवेशनात दिली.

वांद्राच्या नर्गिस दत्त नगरमध्ये गेल्या दहा वर्षात तब्बल ४९ हजार वेळा आग लागल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. या नगरमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्या आहेत. आग लागल्यानंतरही या ठिकाणी दुमजली आणि तीनमजली झोपड्या झटक्यात उभ्या राहतात. त्यामुळे या झोपडपट्यांची तपासणी होणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. या झोपडपट्यांमध्ये बांग्लादेशी घुसखोरी राहतात, अशी चर्चा होताना दिसत होती. यामुळे पोलिसांनी झोपडपट्यांची तपासणी केल्याचे पाटील म्हणाले. झोपडपट्यांमध्ये बांग्लादेशी राहत नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला होता. मात्र, बांग्लादेशी घुसखोरांच्या संशयावरुन पाटील यांनी पुन्हा पोलिसांच्या मदतीने प्रत्येक झोपडीची कसून तपासणी करण्याची घोषणा केली.

हेमंत टकले यांनी केले सवाल

नर्गिस नगरमधील झोपडपट्टीची जागा ही म्हाडा प्राधिकरणाच्या अखत्यारित आहे. म्हाडाने या झोपडपट्टीतील २१६ झोपडपट्यांचे पुनर्वसन केले आहे. परंतु, अजूनही १६०० झोपडपट्या नर्गिस दत्त नगरमध्ये आहे. या झोपडपट्यांमध्ये नक्की कोण राहतं? याची कडक तपासणी पोलिसांच्या माध्यमातून केले जाईल, असे रणजित पाटील म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हेमंत टकले यांनी सांगितले की, एकदा पक्की घरे झाली की येथे उंचच्या उंच पोटमाळे उभारुन झोपड्या उभ्या राहतात. गेल्या ७ ते ८ वर्षांत येथे किती वेळा आगी लागल्या, या प्रकरणात कुणाचे लागेबांधे आहेत, कुठले षडयंत्र आहे का, एलपीजी सिलेंडरमुळे आग लागते असे निष्कर्ष काढण्यात आले आहे. परंतु, या लोकांना सिलेंडj कसे मिळतात? या झोपडपट्यांमध्ये किती लोक राहतात? असा सवाल टकले यांनी केला.

- Advertisement -

झोपडपट्या विक्रीचा बाजार सुरु – भाई जगताप

यावर कॉंग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप म्हणाले की, झोपडीदादा आणि अधिकारी यांच्या संगमताने या परिसराता अनधिकृत झोपड्या उभारल्या जातात आणि आगीही लावल्या जातात. त्यानंतर पुन्हा झोपड्या उभारल्या जातात आणि विकल्या जातात. असा बाजार या ठिकाणी चालत असल्याचे भाई जगताप म्हणाले. यावर रणजीत पाटील यांनी झोपडीदादा आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -