घरदेश-विदेशते बिर्यानी देतात तर आम्ही गोळ्या - योगी आदित्यनाथ

ते बिर्यानी देतात तर आम्ही गोळ्या – योगी आदित्यनाथ

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रसला खडे बोल सुनावले आहेत.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या हमल्यात शहीद झालेल्यांना काल देशभरात श्रद्धांजली देण्यात आली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या हल्ल्याची निंदा केली. याच बरोबर काँग्रेसवर कसून टीका केली. राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान योगींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाना साधला. निवडणुक जवळ आल्यावर राहुल गांधींना हिंदू दिसतात. जानवे घालून ते फक्त हिंदूत्वाचा ठोंग करतात. मागील सरकारने कसाबला बिर्यानी दिली होती तर आमच्या सरकारने त्याला गोळ्या दिल्या असे  वक्तव्य योगींनी केले आहे. राजस्तानच्या मकराना तालूक्यात ते बोलत होते.

काय म्हणालेत योगी

“काँग्रेसने नेहेमीच विभाजनाचे राजकारण केले आहे. याच कारणामुळे देशामधील दहशतवादी घटना वाढल्या. काँग्रेसच्या राजवटीत अशा दहशतवाद्यांना बिर्यानी भरवली जात होती. आम्ही त्यांना गोळ्या दिल्या आहेत. लोकतंत्रात दहशतवाद आणि नक्षलवाद्यांना स्थान नाही. हरल्यानंतर आता काँग्रस वैतागली आहे. यामुळे देशासाठी प्राण दिलेल्या जवानांचा काँग्रेस अपमान करत आहे. काँग्रेसचे नेता नक्षलवाद्यांची तुलना क्रांतिकारकांशी करतात यांना कोण समजवेल? देशावर जर कोणते संकट आले तर राहुल गांधींना कोणीही पीडित दिसत नाही तर फक्त त्यांच्या आजींची (इंदिरा गांधी) आठवण येते.”- योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेश मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -