घरमुंबईमुंबईत पार पडला पहिला 'गे' विवाह सोहळा

मुंबईत पार पडला पहिला ‘गे’ विवाह सोहळा

Subscribe

दक्षिण भारतात राहणारा विनोद फिलीप आणि मूळचा फ्रान्सचा असलेला विन्सेंट हे दोघेही मुंबईच्या एका हॉटेलमध्ये समलैंगिक विवाह बंधानात अडकले आहेत.

काही दिवसांपूर्वीच सुप्रिम कोर्टाने कलम ३७७ नुसार दोन समलैंगिक व्यक्तींनी आपापसात शारीरिक संबध ठेवल्यास तो गुन्हा नसल्याचा निर्णय दिला होता. या निर्णयानंतर पहिल्यांदाच विनोद फिलीप आणि विन्सेंट हे दोघेही समलैंगिक विवाह बंधनात अडकले आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर मुंबईत झालेला हा पहिलाच समलैंगिक विवाह सोहळा आहे. मित्र आणि घरचांच्या उपस्थितीत ते दोघेही मुंबईतील एका हॉटेल मध्ये विवाह बंधनात अडकले आहेत. ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेला ४३ वर्षीय विनोद फिलीप हा दक्षिण भारतात राहणारा असून तो रेनबो व्हॉइस या कंपनीचा मालक आहे.  तर विन्सेंट हा ४७ वर्षाचा असून तो मुळचा फ्रान्सचा आहे.

अशी झाली भेट  

दोन वर्षांपूर्वी दोघेही पॅरिस मध्ये एका सोशल अॅपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले. यानंतर दोघेही ६ महिने एकमेकांना डेट करत होते. आधी मैत्री आणि नंतर या मैत्रीच रूपांतर प्रेमात झाल आणि मग ते दोघेही एकमेकांसोबत राहायला लागले. त्या नंतर या दोघांनी ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. विन्सेंट सोबत लग्नाचा निर्णय जेव्हा विनोदने घरी सांगितला, तेंव्हा सूरवातीला घरच्यांनी त्याला विरोध केला. मात्र नंतर त्यांच्या नात्याला स्विकारले. मागील वर्षाचा अखेरीस डिसेंबर महिन्यात त्या दोघांनीही फ्रान्स मध्ये लग्न केल आणि आता कुटुंबीय आणि मित्रांचा उपस्थितीत १ फेब्रुवारीला मुंबईत पार्टीच आयोजन करण्यात आल होत.

- Advertisement -

एलजीबीटी च्या सदस्यांची ही उपस्थिती

विनोद हा दोनवर्षां पूर्वी चेन्नई येथून मुंबईत आला आणि एलजीबीटी कम्युनिटीसाठी काम करू लागला. त्यामुळेच या कार्यक्रमाला अनेक एलजीबीटी कम्युनीटी सदस्यांची देखील उपस्थिती होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -