घरमुंबईअकरा वर्षांच्या मुलीवर वयोवृद्धाकडून लैगिंक अत्याचार

अकरा वर्षांच्या मुलीवर वयोवृद्धाकडून लैगिंक अत्याचार

Subscribe

एका अल्पवयीन मुलीवर सत्तर वर्षीय वृद्धाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी गोरेागाव पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे.

अकरा वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित सत्तर वर्षांच्या वयोवृद्धाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बलात्कारासह पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच आरोपी वयोवृद्धाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत अकरा वर्षांची मुलगी तिच्या पालकांसोबत गोरेगाव परिसरात राहते. तिची आई आजारी असल्याने ती तिच्या आजीकडे उपचारासाठी गेली होती. सध्या ही मुलगी तिच्या वडिलांसोबत तिथे राहते.

आरोपी वृद्धाचे रेशनिंगचे दुकान

तिचे वडिल काहीच कामधंदा करीत नसून त्यांना दारु पिण्याचे व्यसन आहे. आरोपी वयोवृद्धाचे परिसरात रेशनिंग दुकान असून तो अधूनमधून त्यांच्या घरी येत होता. पिडीत मुलीच्या वडिलांसोबत मद्यप्राशन करुन अनेकदा तो त्यांच्या घरी राहत होता. याच दरम्यान त्याने पिडीत मुलीवर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असा दमही तिला दिला होता. गेल्या काही दिवसांपासून तो तिच्यावर सतत लैगिंक अत्याचार करीत होता.

- Advertisement -

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

या लैगिंक अत्याचाराला कंटाळून तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला होता. ही माहिती मिळताच तिची आई घरी आली होती. यावेळी तिने रात्री उशिरा घडणार्‍या घटनेची तिच्या आईला सांगितली. या घटनेनंतर तिने गोरेगाव पोलीस ठाण्यात संबंधित वयोवृद्ध आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी बलात्कारासह पोक्सो अंतर्गत विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच रविवारी आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दिडोंशी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीला मेडीकलसाठी पाठविण्यात आले असून लवकरच आरोपीचीही मेडीकल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -