घरमुंबईमुंबईत पाणी तुंबल्यास प्रशासनाबरोबरच महापौरही जबाबदार

मुंबईत पाणी तुंबल्यास प्रशासनाबरोबरच महापौरही जबाबदार

Subscribe

मुंबईत पाणी तुंबल्यास प्रशासनाबरोबरच महापौरही जबाबदार असल्याचा इशारा विरोधी पक्षांनी महापौरांना इशारा दिला आहे.

मुंबईतील नालेसफाईचे पावसाळयापूर्वीचे काम ९९ टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असतानाच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हे काम असमाधानकारक असल्याचा आरोप केला आहे. महापौरांनी खुद्द नालेसफाईचे काम झाले नसल्याचे मान्य केल्याने, प्रशासन कुठेतरी खोटी माहिती देवून जनतेची दिशाभूल करत आहे. त्यामुळे पावसाळ्यात कुठेही पाणी तुंबल्यास अथवा साचल्यास याला प्रशासनासोबतच महापौरही जबाबदार असतील, असा इशारा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिला आहे.

विरोधी पक्षांनी दिला इशारा

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शनिवारी महापालिका कामांच्या आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर हे विधान केले होते. तत्पूर्वी महापौरांनी शुक्रवारी महापालिका सभागृहातही नालेसफाईचे काम समाधानकारक झाले नसल्याचे सांगितले होते. या विधानाचा समाचार विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी घेतला. मागील वर्षी नालेसफाईचे काम असमानधानकारक झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. त्यानंतर पावसाळ्यात अनेक भाग पाण्याखाली गेले होते. परंतु हे पाणी तुंबलेले असतानाही महापौरांनी कंत्राटदारांची भलामण करत पाणी तुंबले नव्हते तर साचले होते,असा युक्तीवाद करत त्यांना पाठिशी घालण्याचे काम केले होते. परंतु आता त्याच महापौरांना नालेसफाईबाबत उपरती झाल्यामुळे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, त्यांना प्रशासनाकडून किमान कामे करून घ्यावीत,अशी सूचना केली आहे. मुंबईत नालेसफाईचे काम योग्यप्रकारे झालेले नाही. प्रशासन कितीही सफाईचा दावा करत असले तरी मुंबईकरांना यंदाही तुंबणार्‍या पाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे,असेही राजा यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

विरोधी पक्षांनी नालेसफाईबाबत जे मत मांडले आहे, तेच आज महापौर मांडत आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. सत्तेचे प्रमुख म्हणून महापौरांनी ही नालेसफाई योग्य रितीने करून घ्यावी. अन्यथा पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाऐवढेच महापौरही जबाबदार राहतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. राष्ट्वादी काँग्रेसचे गटनेत्या राखी जाधव यांनीही महापौरांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल अभिनंदन करत, विरोधी पक्ष म्हणून आम्ही जे सांगत आहोत, ते आज महापौर बोलत आहे. त्यामुळे नालेसफाईचे काम योग्यप्रकारे करून घेण्याची जबाबदारी महापौरांची आहे. जर प्रशासनाकडून नालेसफाईचे काम करून घेता येत नसेल तर सत्ताधारी पक्ष महापालिका चालवण्यास सक्षम नाहीत, असा समज खरा ठरेल.

महापौर खरे बोलत आहे. मुंबईला खर्‍या अर्थाने अशाच महापौरांची गरज आहे. त्यामुळे त्यांना धन्यवाद. परंतु महापौरांनी मांडलेल्या मताचा गंभीर विचार होण्याची गरज आहे. एकाअर्थी ९९ टक्के नालेसफाईचा दावा करणारे प्रशासन कुठे तरी खोटे बोलत आहे. त्यामुळे महापौरांच्या विधानानंतर प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण करायला हवे, असे आवाहन सपाचे गटनेते रईस शेख यांनी केले आहे.

- Advertisement -

वाचा – मुंबईकरांसाठी वाईट बातमी; यंदा या भागांमध्ये तुंबणार पाणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -