घरदेश-विदेश'पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणताही धोका नाही'

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणताही धोका नाही’

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचे आलेले पत्र हा खोडसाळपणा असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचे पत्र राजस्थानचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या नावे भाजपा कार्यालयात २९ मे रोजी आले होते. मात्र तपासानंतर कोणीतरी खोडसाळपणा केला असल्याची माहिती समोर आली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

राजस्थानचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या नावे भाजपा कार्यालयात २९ मे रोजी एक पत्र आले होते. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच राजेश सैनी, असे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचे नावही त्यात लिहिण्यात आले होते. त्यानंतर सैनी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती. त्या चिठ्ठीवर ती पाठवणाऱ्याचा पत्ताही लिहिण्यात आला होता. तसेच या धमकीपत्रात चार जणांच्या नावांचा देखील उल्लेख करण्यात आला होता. या चिठ्ठीवर देण्यात आलेला पत्ता हा जयपूरमधील असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी निगडीत विषय असल्याने सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्या पत्रात नमूद केलेल्या पत्त्यावर तपास केला. तसेच चार जणांची चौकशी देखील केली. परंतु त्या ठिकाणी असलेले कोणीही या घटनेत सहभागी नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश दाधिच यांनी दिली आहे. कोणीतरी खोडसाळपणा केला असल्याचेही दाधिच यांनी सांगितले आहे.


वाचा – नरेंद्र मोदींनी घेतली अरुण जेटलींची भेट

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -