घरमुंबईअंथरुणाला खिळलेल्या पालिका रुग्णालयांतील रुग्णांना मोफत डायपर

अंथरुणाला खिळलेल्या पालिका रुग्णालयांतील रुग्णांना मोफत डायपर

Subscribe

महापालिका रुग्णालयांमधील वृध्द व अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना मोफत डायपर उपलब्ध करून देण्याची मागणी होत असून महापालिका सभागृहात याबाबतचा ठराव पारित करण्यात आला आहे. त्यामुळे याबाबतचा ठराव मंजूर करत महापौरांनी पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वृध्द व अंथरुणाला खिळलेले रुग्ण यांना नैसर्गिक विधी झाल्याचे भान राहत नसल्यामुळे, तसेच त्यांना शौचालयापर्यंत घेवून जाणे शक्य नसल्याने असे रुग्ण नैसर्गिक विधी रुग्णशय्येवरच करतात. त्यामुळे त्यांचे कपडे व अंथरुण खराब होते व त्यांना इतर रुग्णांना संसर्ग होवून आजार बळवण्याची शक्यता अधिक असते.

शिवाय रुग्णाचे कपडे व अंथरुण सतत ओले होत राहिल्याने, अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या पाठिवर जखमा होत असतात. अशा रुग्णांना डायपरचा वापर करणे बिकट आर्थिक परिस्थितीमुळे परवडणारे नसते. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अशाप्रकारच्या रुग्णांसाठी मोफत डायपर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे भाजपच्या नगरसेविका आशा मराठे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली. महापालिका सभागृहात काही कारणास्तव उपस्थित न राहता आल्याने मराठे यांनी ही सूचना मांडण्याचे अधिकार भाजप नगरसेविका सुरेखा लोखंडे यांना दिले होते. त्यानुसार ही सूचना मांडल्यानंतर एकमताने मंजूर करत महापौरांनी पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनाकडे पाठवण्याचे निर्देश सभागृहाला दिले.

- Advertisement -

रुग्णालयांतील कर्मचार्‍यांवर याचा अतिरिक्त भार पडून सर्वच रुग्णांवर एकाच वेळी लक्ष ठेवणे त्यांना कठीण होते. त्यामुळे अशाप्रकारच्या अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना मोफत डायपर उपलब्ध करून दिल्यास अतिरिक्त ताण पडणार नाही तसेच रुग्णालाही पासून दिलासा मिळेल,असे मराठे यांनी आपल्या सूचनेत म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -