घरमहाराष्ट्रAjit Pawar : ज्यावेळेस दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील तेव्हा मी...; अजितदादांचे...

Ajit Pawar : ज्यावेळेस दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील तेव्हा मी…; अजितदादांचे मिश्किल भाष्य

Subscribe

खेड : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महायुतीतील जागावाटपा अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र शिरूर लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप मोहिते पाटील यांनी आढळराव पाटील यांना तीव्र विरोध केला होता. अशातच आज (20 मार्च) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानकपणे खेड तालुक्याच्या दौरा करत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या घरी येऊन पाहुणचार घेतला. यानंतर आता दिलीप मोहिते पाटील यांचा विरोध मावळला असून शिवाजी आढळराव पाटील यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आजच्या खेड दौऱ्यात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एक वक्तव्य केले जे सध्या चर्चेत आहे. (When Dilip Mohite Patil becomes Minister I will become Chief Minister Difficult commentary by Ajit Pawar)

हेही वाचा – Kedar Shinde : शाहीर साबळेंच्या स्मृतिदिनानिमित्त नातू केदार शिंदेंची भावुक पोस्ट

- Advertisement -

अजित पवार यांनी आज अचानकपणे खेड तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या घरी जवळपास 25 वर्षांनंतर भेट घेत पाहुणचार घेतला. त्यानंतर त्यांनी बैठकांना सुरुवात केली. अजित पवार यांनी जुन्नर, आंबेगाव, खेड, भोसरी, शिरूर मतदार संघातील बैठकाही घेतल्या. यावेळी बैठकीत आमदार मोहिते पाटील यांनी प्रस्तावित केलेल्या प्रकल्प, विकास कामाना मान्यता मिळावी. यासह विविध विषयांवर कार्यकर्त्यांनी मत मांडले. महादेव ठाकुर पाटील यांनी आमदार मोहिते पाटील यांना मंत्रिपद द्या अशी मागणी केली. तसेच एका कार्यकर्त्याने अजित पवार यांना तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजेत, यासाठी तुम्ही सांगाल ते करायला आम्ही तयार आहोत, असे वक्तव्य केले. यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले की, ज्यावेळेस दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील, तेव्हा मी मुख्यमंत्री होईल. अजित पवारांच्या या मिश्किल टिपण्णीची उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

हेही वाचा – Jayant Patil : द. नगरमधून ते निवडून येतील, पण…; निलेश लंकेंबाबत जयंत पाटलांचे मोठे विधान

- Advertisement -

उमेदवारी नाकारली म्हणून आढळराव पाटील शिवसेनेत

दिलीप मोहिते पाटील यांची नाराजी दूर झाल्यामुळे आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीबाबत सर्वांना विश्वासात घेऊन घोषणा केली जाईल, असे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. तसेच त्यांनी असेही म्हटले की, आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव तालुका अध्यक्ष आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पद असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यांना 2004 मध्ये आपण उमेदवारी नाकारली म्हणून ते शिवसेनेत गेले, अशी खंत अजित पवार यांनी बोलून दाखवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -