घरपालघर२६ गाव नळ पाणीपुरवठा योजनेसाठी १८ कोटी रुपये मंजूर

२६ गाव नळ पाणीपुरवठा योजनेसाठी १८ कोटी रुपये मंजूर

Subscribe

योजनेतून नागरी भागात म्हणजे पालघर नगरपरिषद हद्दित ७३.०८ टक्के व ग्रामीण भागात २६.९२ टक्के पाणीपुरवठ्याचे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे.

पालघर: पालघर शहरासाठी पाणीपुरवठा करणार्‍या 26 गाव नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी शासनाच्या नगरविकास विभागाकडून १८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आचारसंहितेच्या एक दिवस अगोदर हा निधी मंजूर झाल्याने पालघर शहरवासीयांची पाण्याची अडचण दूर होणार आहे. २६ गाव नळ पाणीपुरवठा योजना नोव्हेंबर २०११ रोजी पालघर नगरपरिषदेकडे हस्तांतरण करण्यात आली होती. या योजनेची देखभाल दुरुस्ती पालघर नगर परिषदेकडून करण्यात येत आहे. या योजनेत एकूण २८ गावांचा समावेश आहे. यातील आठ गावे ही पालघर नगर परिषद क्षेत्रात व इतर वीस गावे सातपाटी, शिरगांव, कोळगांव, धनसार, दापोली, मोरेकुरण, खारेकुरण, उमरोळी, देवखोप, शेलवाली, अंबाडी, वरखुंटी, कमारे, पडघे, वागुळसार, नंडोरे, वाकोरे, पंचाळी, बिरवाडी व हरणवाडी ही गावे जिल्हा परिषद पालघर अंतर्गत ग्रामीण भागात आहेत. योजनेतून नागरी भागात म्हणजे पालघर नगरपरिषद हद्दित ७३.०८ टक्के व ग्रामीण भागात २६.९२ टक्के पाणीपुरवठ्याचे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे.

पालघर आणि २६ गावे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना ही सन २०३१ ची अंदाजित लोकसंख्या १,७६,७३० गृहित धरुन तयार करण्यात आलेली आहे. सदर योजने अन्वये १२.०० द.ल.लि. प्रतिदिन पाणी साठा सद्यस्थितीत पालघर नगरपरिषदेकडे होत आहे. त्यातील पालघर शहरास ५ एमएलडी आणि ७ एमएलडी इतर गावांना पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठा योजनेचे पंपिंग स्टेशन वाघोबा घाटात असून या पंपिंग स्टेशनवर असलेल्या मशिनरींना प्रदीर्घ काळ झाला असून पाणी खेचण्यासाठी या मशिनरी उपयुक्त नसल्याने 18 कोटी निधीतून नवीन मशिनरी घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नवीन पाण्याच्या टाक्या व पालघर शहरातील ज्या भागात अजून पर्यंत पाण्याच्या पाईपलाईन पोहोचलेल्या नाहीत, त्या तिथे नव्याने पाईपलाईन टाकण्यासाठी हा निधीचा विनियोग होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -