घरमहाराष्ट्रDevendra Fadnavis : माझी काही इमेज ठेवा; संजय राऊतांबाबतच्या प्रश्नावर फडणवीसांचे मिश्किल भाष्य

Devendra Fadnavis : माझी काही इमेज ठेवा; संजय राऊतांबाबतच्या प्रश्नावर फडणवीसांचे मिश्किल भाष्य

Subscribe

अकोला : भारतीय जनता पार्टीच्यावतीने ज्या उमेदवारांची घोषित झाली आहे. त्या-त्या ठिकाणी एकूण निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याकरता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौरे करत आहेत. यावेळी त्यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी “माझी काही प्रतिमा ठेवा” असे मिश्किल भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. (Keep some image of me Devendra Fadnavis difficult comment on Sanjay Rauts question)

हेही वाचा – Ajit Pawar : ज्यावेळेस दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील तेव्हा मी…; अजितदादांचे मिश्किल भाष्य

- Advertisement -

बुलढाणा येथील सभेत बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, औरंगजेबचा जन्म पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावाजवळ झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींची विचारसरणी औरंगजेबासारखी आहे. या विचारसरणीतून महाराष्ट्रावर हल्ले होत आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला होता. यासंदर्भता देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, संजय राऊत कोण आहेत. तुम्ही संजय राऊतसारख्या माणसांबद्दल मला प्रतिक्रिया विचारता. माझी काही प्रतिमा ठेवा, असे मिश्किल भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा पिकनिकला गैरहजर: मुंबई इंडियन्स आणि त्याच्यात अजूनही बिनसलेलेच?

- Advertisement -

हर्षवर्धन पाटील महायुतीच्या उमेदवाराचं काम करतील

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर झाली आहे का? या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हर्षवर्धन पाटील यांनी नाराजी नव्हती, मात्र त्यांचे प्रश्न काही होते. एवढे वर्ष समोरासमोर लढतो त्यावेळेस निश्चित त्यांचे काही प्रश्न असतात. त्यांचे प्रश्न सोडवण्याचं मी आश्वासन दिलं आहे. त्यातल्या काही अडचणी सोडवल्या आहेत. मला पूर्ण विश्वास आहे हर्षवर्धन पाटील जेव्हापासून भाजपात आले आहेत. तेव्हापासून त्यांनी सातत्यााने भारतीय जनता पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाच्या प्रती समर्पित भावनेने ते काम करत आहे. त्यांच्यासारखं नेतृत्व मोठं झालं पाहिजे ही भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की, पूर्ण ताकदीने हर्षवर्धन पाटील हे आमच्या महायुतीच्या उमेदवाराचं काम करतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -