घरमहाराष्ट्रओबीसी नेत्यांनी माझ्या नादाला लागू नये; प्रकाश आंबेडकरांचा भुजबळाना थेट इशारा

ओबीसी नेत्यांनी माझ्या नादाला लागू नये; प्रकाश आंबेडकरांचा भुजबळाना थेट इशारा

Subscribe

वंचित बहुजन आघाडीने शनिवारी (25 नोव्हेंबर) आयोजित केलेल्या संविधान सन्मान महासभेत ते शिवाजी पार्कवरून बोलत होते.

मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या वाद सुरू झालेला आहे. ओबीसीचे जे काही नेते आहेत सध्या. त्यांनी कृपा करून माझ्या नांदाला लागू नये, कारण, इतिहास जर काढला तर तुम्ही मंडल बरोबर नव्हता तर तुम्ही क मंडल बरोबर होता. मग ते शेंडगे असतील किंवा मग भुजबळ असोत.ओबीसीचं आरक्षण मिळवणारे आम्हीच आहोत जनता दलाबरोबर असे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांच्यावर थेट निशाणा साधला. (OBC leaders should not listen to me Prakash Ambedkar direct warning to Bhujbal)
वंचित बहुजन आघाडीने शनिवारी (25 नोव्हेंबर) आयोजित केलेल्या संविधान सन्मान महासभेत ते शिवाजी पार्कवरून बोलत होते.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आता वाचवता येत नाही म्हणून भीडवण्याची भाषा केली जात आहे. मुळात येथील शासनाने विकासाच्या योजना आखल्याच नाहीत. हे दुर्देवाने म्हणावे लागते. त्यामुळे विकास हवा असेल तर आरक्षण हा एकच मार्ग अशी परिस्थी सध्या निर्माण झाली आहे. एकुणच आरक्षण हा काही विकास नाही, आरक्षण हे प्रतिनिधीत्व आहे. राजे महाराजांच्या कालावधीमध्ये जे आता दलित आदीवासी, ओबीसी आहेत त्यांना त्या काळात चोपदार होण्याचासुद्धा अधिकार नव्हता. शिवाजी महाराजांचा कालखंड जर सोडला तर सगळ्या राजांच्या काळात असे होते.
आज जे आरक्षणवादी आणि विरोधी आहेत. तेच महाराष्ट्रातील शिक्षण महर्षी आहेत. नाहीत असे नाही. त्यांनाही कळते. आज भारतातून परदेशामध्ये शिकायला विद्यार्थी किती जातात? सगळ्यांनी याची माहिती घ्या. आज 20 लाख विद्यार्थी परदेशात जातात. एका विद्यार्थ्यावर 40 लाख रुपये खर्च होत असतील तर किती निधी बाहेर जातो हे लक्षात घ्या. जे स्वतःला शिक्षण महर्षी, आणि आरक्षणाचे नेते म्हणून घेतात तेच पहिल्यांदा येथील विकासाचे विरोधक आहेत. कारण, आपल्या संस्था चालल्या पाहीजेत म्हणुन त्यांनी नवीन संस्था येऊ दिल्या नाहीत आणि शिक्षण संकुचित केले. जेथे रोजगार उपलब्ध झाला असता, परदेशातील निधी थांबला असता पण असे कधीच झाले नाही. आणि असे जर झाले असते तर देशात आज वर्षाला 20 लाख रोजगार निर्माण झाले. मंत्री झालो की, अनेकांना शिक्षण महर्षी व्हावे वाटते अशी आजची परिस्थिती आहे.

- Advertisement -

हेही वाचा : संविधान जगातील पवित्र ग्रंथ पण भाजपाची भाषा…नाना पटोलेंचा घणाघात

सरकारच्या अविकसीत धोरणामुळे जो तो आरक्षण मागतोय

शेवटी आज आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हाच म्हणालो होतो की, मराठा आणि ओबीसींचे ताट वेगळे पाहीजे होते. चाळीस वर्षापूर्वी काही मुद्दे निकाली लागले होते. पण आज चाळीस वर्षानंतर खूप बदल झाला आहे.पण शासनाच्या अविकसीत धोरणामुळे आज अनेकांना असे वाटते की, आरक्षणामुळे आपला विकास होईल. पण आज त्यावरूनच तणाव निर्माण झाला आहे.कारण, दोन्ही समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. याला मी दुर्दैव मानतो. आज परिस्थितीनुसार पाहले पाहीजे पण आपण ते पाहत नाही असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -