घरक्राइम26/11 Terrorist Atack : 'त्या' काळ्या आठवणींना रविवारी 15 वर्ष पूर्ण; आता...

26/11 Terrorist Atack : ‘त्या’ काळ्या आठवणींना रविवारी 15 वर्ष पूर्ण; आता मुंबईची सुरक्षा किती?

Subscribe

26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून आपल्या देशात साजरा केल्या जातो. आणि याच दिवशी आतंकवाद्यानी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्याच देशावर म्हणजे भारतावर हल्ला केला होता.

मुंबई : देशातील सर्वात मोठा आतंकवादी हल्ला म्हणजे 26/11 चा हल्ला. हा हल्ला मुंबईकर तर सोडाच संपूर्ण देश कधीच विसरणार नाही. त्याच थरकाप उडवणाऱ्या 26/11 च्या हल्ल्याला रविवारी (26 नोव्हेंबर) रोजी 15 वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्याच्या पंधरा वर्षानंतर मुंबईची सध्याची सुरक्षा कशी आहे? की, अद्यापही मुंबईकरांनी या हल्ल्यातून काहीच धडा घेतला नाही हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. (26/11 Terrorist Attack  That dark memory completes 15 years on Sunday What is the security of Mumbai now)

26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून आपल्या देशात साजरा केल्या जातो. आणि याच दिवशी आतंकवाद्यानी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्याच देशावर म्हणजे भारतावर हल्ला केला होता. हा दिवस आजही मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवणारा असाच दिवस आहे. कारण, या हल्ल्यात तब्बल 34 परदेशी नागरिकांसह 197 जण ठार झाले होते. तर आठशेहून अधिकजण गंभीर जखमी झाले होते. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी 9 दहशतवाद्यांना ठार केले करून अजमल कसाब या दहशतवाद्यास अटक करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते. असे जरी असले तरी समुद्रामार्गे मुंबईत दाखल झालेल्या आतंकवाद्याला रोखण्यासाठी आता मुंबई पोलिसांसह गृहविभागाने कोणती पाऊले उचलली आहेत हे पाहणे गरजेचे आहे.

- Advertisement -

हेही वाचा : हा सागरी किनारा…; सुरक्षेसाठी 28 बोटींची खरेदी, गृह विभागाची माहिती

समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी अत्यल्प संसाधने

महाराष्ट्राच्या तब्बल 720 किलो मीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे तर मुंबई शहराला 149 किमी समुद्रकिनारा लाभला आहे. असे असताना या समुद्र किनाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तटरक्षक दलाकडे असून या दलाकडे सुरक्षेसाठी आज फक्त 8 बोटी कार्यरत आहेत. तर राज्याच्या सागरी किनारा सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या वतीने 28 नवीन बोटी तीन टप्प्यात खरेदी केल्या जाणार आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात 10 नवीन बोटी खरेदी केल्या जातील, अशी माहिती गृह विभागाने शनिवारी (25 नोव्हेंबर) दिली. अद्याप त्याही खरेदी करण्यात आलेल्या नाहीत. हे वास्तव आहे.

- Advertisement -

हेही वाचा : PHOTO : मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन; पोलीस अलर्ट, बघा CSMT वर काय घडलं?

चार वर्षांनंतर लटकवला होता कसाब फासावर

26 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यापैकी दहशतवादी अजमल कसाब याला 27 नोव्हेंबर 2008 रोजी जीवंत पकडले होते. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला कारागृहात ठेवले होते. तर 21 नोव्हेंबर 2012 रोजी म्हणजेच घटनेच्या तब्बल 4 वर्षानंतर दहशतवादी अजमल अमीर कसाब याला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -