घरमुंबई'डीजे'बंदी विरोधात काळ्या फिती लावून निषेध!

‘डीजे’बंदी विरोधात काळ्या फिती लावून निषेध!

Subscribe

मुंबई, पुणे, कोल्हापूरसारख्या प्रमुख शहरातील अनेक मंडळांनी डिजेबंदी निर्णयाच्या विरोधात निषेध व्यक्त केला आहे.

मुंबईसह राज्यभरात गणपती विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झाली असून, लोक मोठ्या संख्येने बाप्पाला निरोप देत आहेत. दरम्यान यंदाचा गणेशोत्सव डीजे बंदीच्या निर्णयामुळे विशेष चर्चेत राहिला. विसर्जन मिरवणुकांमध्ये डॉल्बी आणि डीजेच्या वापरावर हायकोर्टाने बंदी आणल्यामुळे राज्यभरातील गणेश भक्तांमध्ये नाराजाचे वातावरण पाहायला मिळते आहे. घाटकोपरच्या विश्व अजिंक्य गणेशोत्सव मंडाळानेही डीजे बंदीविरोधी निषेध व्यक्त केला आहे. डीजेच्या वापरावर बंदी आणल्याच्या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी या मंडळातील कार्यकर्ते मिरवणुकीदरम्यान काळ्यी फिती लावणार आहेत. डिजे आणि डॉल्बीच्या कर्कश्य आवाजामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होत असल्याची ओरड गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. याशिवाय डीजे- डॉल्बीच्या बंदीसाठीही वारंवार मागणी केली जात होती. अखेर यंदाच्या वर्षी मुंबई हायकोर्टाने याबाबत अंतिम निर्णय देत डीजेच्या वापरावर बंदी आणली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूरसारख्या प्रमुख शहरातील अनेक मंडळांनी डिजेबंदी विरोधात निषेध व्यक्त केला आहे.


वाचा : पुढच्या वर्षी बाप्पा येणार लवकर!

पुणे-कोल्हापुरात जाहीर निषेध

पुण्यामध्ये डीजे बंदीला जोरदार विरोध करण्यात आला. ‘पुण्यात डीजे नाही तर विसर्जनही नाही’ अशी भूमिका पुणातल्या तब्बल १५० गणेशोत्सव मंडळांनी घेतली आहे. या सर्व मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवरच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात उदयन राजे यांनीही डीजे बंदीच्या निर्णयाचा जाहीर सभेत विरोध केला होता. ‘डीजे-डॉल्बीच्या वापरावर बंदी आणली तरी आम्ही डीजे लावणारच’ अशाप्रकारची प्रतिक्रिया उदयन राजे भोसले यांनी दिली होती.

- Advertisement -

दरम्यान एकीकडे डीजे बंदीच्या या निर्णयाला अनेक मंडळांकडून विरोध होत असताना, दुसरीकडे मात्र चेंबूर येथील नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्नेह गणेशोत्सव मंडळाने या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. ”डीजे बंदीच्या कोर्टाच्या निर्णयाचे पालन महाराष्ट्र स्नेह मंडळ करणार आहे. कोर्टाच्या निर्णयाला पाठिंबा देत आम्ही विसर्जन मिरवणूकीत ढोल पथकाचा समावेश करणार आहोत. सर्वांनी कोर्टाच्या निर्णयाचे पालन करावे” – शेखर कुलकर्णी, महाराष्ट्र सेन्ह मंडळ चेंबूर (चेंबूर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -