घरमहाराष्ट्रपुण्यातील मानाचे पाच गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

पुण्यातील मानाचे पाच गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

Subscribe

राज्यातल्या सांस्कृतिक शहरण म्हणून ओळखल्या जाण्या पुण्यामध्ये मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीला वाजत -गाजत सुरुवात झाली आहे.

दहा दिवसांच्या पाहुंचारानंतर गणपती बाप्पा आज त्यांच्या घरी निघाले आहेत. पुण्यातला गणेशोत्सव तर खास असतो त्यात तर गणेश विसर्जनाची मिरवणुक ही तितकीच खास असते. कारण पुण्यातला गणेश विसर्जन मिरवणुक सोहळा अनोखा असतो. पुण्याचे मानाचे पाच गणपती विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत. कसबा, केसरीवाडा, गुरुजी तालीम आणि तांबडी जोगेश्वरी या चार बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. कसबा गणपतीची चांदीच्या पालखीतून मिरवणुक काढण्यात आली आहे.

मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचा वापर

पुण्यामध्ये ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जातो. पारंपारिक पेहरावामध्ये पुणेकर या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. ज्या मार्गावरुन बाप्पाची वसर्जन मिरवणुक निघते त्या मार्गावर फुलांची सजावट आणि सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. पारंपारिक वाद्यांचा वापर करत मिरवणुक काढण्यात आली आहे. हा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक गणेशभक्त पुण्यात येत असतात. यंदा देखील या मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी झाले आहेत.

- Advertisement -

पोलीस बंदोबस्त तैनात

पुण्यामध्ये गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात बाप्पाला निरोप दिला जात आहे. विसर्जन मिरवणुक शांतते व्हावी यासाठी पुणे पोलीस सज्ज झाले आहेत. विसर्जन मार्गात पोलिसांचा चोख बंदोबस्तत तैनात करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -