घरमुंबईबी.कॉम सत्र ६ मध्ये मुलींची बाजी

बी.कॉम सत्र ६ मध्ये मुलींची बाजी

Subscribe

 विविध परीक्षांच्या निकालांना मुंबई विद्यापीठाकडून विलंब होत असताना एप्रिल 2019 मधील उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बी.कॉम सत्र 6 परीक्षेचा निकाल अवघ्या 30 दिवसांत लावण्यात आला आहे. परीक्षेत २३ हजार ६७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. २०१८ मध्ये विद्यापीठाने हा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला होता.

बी.कॉम सत्र 6 परीक्षेसाठी ५१ हजार २६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ५० हजार ७०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये २३ हजार ६७८ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. उतीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १४ हजार ९६९ मुली असून ८ हजार ७०९ मुले आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ६८.७६ टक्केे एवढे आहे. परीक्षेच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. परीक्षेत १५ हजार ५८१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तर ७९ विद्यार्थ्यांची कॉपी प्रकरणे आढळली आहेत. परीक्षेमध्ये तपासणीसाठी २ लाख २२ हजार ६३८ उत्तरपत्रिका होत्या.

- Advertisement -

या उत्तरपत्रिका ३ हजार ७०७ शिक्षकांनी तपासल्या तर ५७ हजार १०८ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन केले. सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व मॉडरेशन ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीने झाले आहे. परीक्षांचे मूल्यांकन वेळेत होऊन निकाल वेळेत लावण्यासाठी पालघर, पनवेल, रत्नागिरी, सावंतवाडी, ठाणे व मुंबई येथे प्राचार्‍यांच्या विशेष बैठका घेतल्या. शिक्षकांनी उन्हाळी सुट्टीतही उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केल्याने निर्णय वेळेत लावणे शक्य झाल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. परीक्षेच्या मूल्यांकनावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर सतत लक्ष ठेऊन होते.

सर्व्हरच्या क्षमतेत वाढ
5० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्याने व विद्यार्थ्यांना निकाल पाहणे सोपे व्हावे यासाठी बी.कॉम सत्र ६च्या आसन क्रमांकानुसार आठ फाईल्स करून त्या संकेतस्थळावर टाकल्या आहेत. यासाठी सर्व्हरची क्षमताही वाढवली आहे. विद्यापीठाच्या www.mumresults.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे.

- Advertisement -

निकाल राखीव
प्रथम, द्वितीय किंवा तृतीय वर्षातील सत्र ५ ची परीक्षा अनुत्तीर्ण असलेले परंतु सत्र 6 ची परीक्षा उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण निकाल प्राप्त झाल्यास तसेच बी.कॉम सत्र ५ चा निकाल जाहीर झाल्यास या विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रित जाहीर करण्यात येईल.

बी.कॉम सत्र ६ चा निकाल मुंबई विद्यापीठाच्या दृष्टीने महत्वाचा असून महाविद्यालयाच्या प्राचार्‍यांनी मूल्यांकनाकडे विशेष लक्ष दिल्याने व शिक्षकांनी वेळेत मूल्यांकन केल्यानेच हा निकाल वेळेत जाहीर करणे शक्य झाले. असेच सहकार्य पुढील परीक्षेतही प्राचार्य व शिक्षक देतील ही अपेक्षा.
– डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

बी.कॉमच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी संख्या जास्त असल्याने तृतीय वर्षाचा निकाल अचूक, निर्दोष व वेळेत लावण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली.
– डॉ. विनोद पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -