घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरSambhajinagar : '...म्हणून तुमच्या 'दुचाकी' कॅबिनेटची आग झाली', दानवेंचा फडणवीसांवर पलटवार

Sambhajinagar : ‘…म्हणून तुमच्या ‘दुचाकी’ कॅबिनेटची आग झाली’, दानवेंचा फडणवीसांवर पलटवार

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे सभा झाली. या सभेत अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे सभा झाली. या सभेत अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला आहे. “संभाजीनागरचे नामांतर तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये केले म्हणता, देवेंद्रजी? मग २०१४ ते २०१९ सालात आपण मुख्यमंत्री होतात तेव्हा का हा निर्णय झाला नाही?”, असा सवाल उपस्थित करत अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. (chatrapati sambhajinagar name change conflict thackeray group leader ambadas danve slams dcm devendra fadnavis)

विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पूर्वीचे ट्विटर आणि सध्याच्या ‘एक्स’वर ट्वीट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “संभाजीनागरचे नामांतर तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये केले म्हणता, देवेंद्रजी? मग २०१४ ते २०१९ सालात आपण मुख्यमंत्री होतात तेव्हा का हा निर्णय झाला नाही? असा सवाल दानवेंनी उपस्थित केला. तसेच, “शिवसेनेने किमान डझनभर आंदोलने केली होती, त्यात तुमचे भाजपवाले मागच्या रांगेत घोषणा द्यायचे. ज्यांनी नामांतराला विरोध केला त्या काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन हे नामांतर उद्धवसाहेबांनी करून दाखवले म्हणून तुमच्या त्या ‘दुचाकी’ कॅबिनेटची आग झाली होती”, असा टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisement -

याशिवाय, लोकांना हे माहिती आहे की कोणी नामांतर केलं. ती चिकलठाणा विमानतळाच्या नामांतराची फाईल शेठजींच्या काखेतून का सुटत नाही? हे पण जरा सांगा..असा सवालही दानवेंनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : संभाजीनगरच्या खासदारानं राम मंदिराला समर्थन दिलं होतं का? फडणवीसांचा सवाल

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“या नगरीला संभाजीनगर असं नाव दिलं पाहिजे, अशी घोषणा पहिल्यांदा हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. पण दुर्दैवाने त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्ष त्यांना ही जाग आली नाही की, या नगरीचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं पाहिजे आणि ज्यावेळी सरकार गेलं त्यावेळी सरकार अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी एक ठराव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण ते काही सफल झाले नाहीत. नवीन सरकार शिंदेजींच्या नेतृत्वात आल्यावर आम्ही सगळ्यात पहिलं काम काही केलं असेल तर औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्याकरता तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आणि मोदींच्या नेतृत्वात त्या प्रस्तावाला अमित शहा यांनी मान्यता दिली. त्यांच्या सहीने हे छत्रपती संभाजीनगर झालं”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अंबादास दानवेंचा अजित पवारांनाही टोला

उजळ माथ्याने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार आम्ही चालवले. आता राष्ट्रवादीचा एक गट तुमच्यासोबत आहे. पण तुमचे नेतृत्व आणि तुम्ही सभांमधून अजित पवारांचा साधा नामोल्लेखही करत नाही, हे नजरेतून सुटणारे नाही. वरून हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या? खरे बहुरूपी तर तुम्ही आहात. प्रश्न तर हा आहे की अजित पवार गटाला हा अनुल्लेख सहन कसा होतो? असे सवाल उपस्थित करत अंबादास दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याव टीकास्त्र सोडले.


हेही वाचा – MODI KA PARIVAR : ‘मोदी परिवार’ हा मोदींनीच फुगविलेला फुगा जनताच फोडणार! ठाकरे गटाचा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -