Eco friendly bappa Competition
घर ठाणे सार्वजनिक गणेशोत्सवांसाठी आनंदाची बातमी; परवानगीसाठी दरवर्षी रांगेत लागण्याची गरज नाही, कारण...

सार्वजनिक गणेशोत्सवांसाठी आनंदाची बातमी; परवानगीसाठी दरवर्षी रांगेत लागण्याची गरज नाही, कारण…

Subscribe

मुंबई : राज्यात हिंदु सणांचं वैभव वाढवण्यासाठी झटणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना (Public Ganeshotsav Mandals) आता सरसकट पाच वर्षांसाठी परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर (Deeoak Kesarkar) यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे या मंडळांना दरवर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांचे खेटे मारावे लागणार नाहीत. मुंबईसह पुणे आणि राज्यातील इतर भागांतील मंडळांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. पण राज्य सरकारने परवानगी देताना एक अट घातली आहे. (Good News for Public Ganesha Festivals No need to queue up for permission every year because)

हेही वाचा – Birth certificate : 1 ऑक्टोबरपासून बदणार नियम बदलणार; सरकार दरबारी फक्त जन्मप्रमाणपत्र महत्त्वाचे

- Advertisement -

भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव जवळ आला की, राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू होते. एकट्या मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध परवानग्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे खेटे घालावे लागतात. यात अनेक मंडळांची अडवणूक होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली या सर्व मंडळांना सरसकट पाच वर्षांची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मंत्री केसरकर यांनी दिली. या निर्णयामुळे सर्व मंडळांना मोठा दिलासा मिळेल. तसंच गणेशोत्सवासारखा विघ्नहर्त्याचा सण निर्विघ्न पार पडेल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

हेही वाचा – कोकणवासीयांचे हाल संपेना, मुंबई ते सिंधुदुर्ग अलायन्स एअरची सेवाही अचानक रद्द

उत्कृष्ट गणेश मंडळांनाच मिळणार पाच वर्षांसाठी परवानगी

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात अधिकृत ट्वीट करण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, गणेश मंडळांना आता पुढील पाच वर्षे उत्सव साजरा करण्यासाठी एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारने पुढील पाच वर्षांसाठी एकाच वेळी परवानगी देण्याचा निर्णय घेतला असला तरी याचा फायदा सरसकट सर्व गणेश मंडळांना मिळणार नाही आहे. राज्य सरकारने त्यासंदर्भात एक महत्त्वाची अट घातली आहे. गेल्या दहा वर्षांत सर्व नियम, कायद्यांचं पालन करणाऱ्या, कोणत्याही तक्रारी नसणाऱ्या अशा उत्कृष्ट गणेश मंडळांनाच पाच वर्षांसाठीची परवानगी एकाच वेळी घेता येणार आहे. त्यामुळे अशा गणेश मंडळांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

- Advertisment -