घरमुंबईकल्याणच्या आधारवाडी कचरा डेपोवर आता हिरवळ पसरणार!

कल्याणच्या आधारवाडी कचरा डेपोवर आता हिरवळ पसरणार!

Subscribe

२० रूपयांत जैविक शेती 

प्रतिनिधी:-कल्याणातील कचर्‍याची समस्या खूपच जटील बनली आहे. मात्र गाझीयाबाद येथील राष्ट्रीय जैविक शेती केंद्राच्या माध्यमातून कल्याणच्या आधारवाडी कचरा डेपोवर शून्य कचरा मोहिम राबविण्यात येणार आहे. पायलट प्रोजक्ट म्हणून या कामास मंगळवारपासून सुरूवात झालीय. विशेष म्हणजे या कचर्‍यात झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे आधारवाडीत डम्पिंग ग्राऊंडवर लवकरच हिरवळ पाहावयास मिळणार आहे. महापालिका क्षेत्रात दररोज ६०० मेट्रीक टन कचरा गोळा होता. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर हा कचरा टाकण्यात येतो; मात्र डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपुष्टात आल्याने हा कचरा डेपो बंद करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने उंबर्डे येथे ३५० मेट्रीक टन व बारावे येथे २०० मेट्रीक टनाचा घनकचरा शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी निविदा काढल्या आहेत. मात्र उंबर्डे आणि बारावेचा प्रकल्प कार्यन्वित होत नाही तोपर्यंत आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद होऊ शकत नाही. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडचा उग्र वास आणि सातत्याने लागलेल्या धुरामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.

आधारवाडी कचरा डेपोवर शून्य कचरा मोहीम राबविण्यासाठी जागरूक नागरिक मंचाने पुढाकार घेतला आहे. पालिका आयुक्त गोविंद बोडके आमदार नरेंद्र पवार जागरूक नागरिक संघाचे श्रीनिवास घाणेकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ पार पडला.गाझीयाबाद येथील राष्ट्रीय जैविक शेती केंद्राच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जात आहे. वेस्ट डिकम्पोजच्या सहाय्याने पाणी व गुळाच्या मिश्रणातून हे द्रावण केले जाणार आहे. ते द्रावण कचर्‍यावर शिंपडल्यानंतर त्यातील बॅक्टेरिया कचरा नष्ट करणार आहेत. त्यानंतर त्या कचर्‍यात मोठ झाडे लावली जाणार आहे. सध्या कचरा डेपोवरील एक एकर जागेत पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला आहे. गेल्या सात दिवसांपासून कचरा डेपोवर १२ कचरा वेचक व एक जेसीबीच्या मदतीने काम सुरू असून, दररोज सुमारे ४० गोणी प्लास्टिक वेगळे करण्यात आले. त्यानंतर कचर्‍यावर डिकम्पोजच्या पाणी शिंपडण्यात आले. येत्या ३५ दिवसांत उत्तम परिणाम दिसून येईल, असे आयुक्तांनी सांगितले. जागरुक नागरीक संघटनेच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबविण्यात येत असुन, या प्रकल्पाला आमदार नरेंद्र पवार यांनी सहकार्य केले आहे. महापालिका व जागरुक नागरीक संघटना यांचे संयुक्त विघमाने हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे.

- Advertisement -
कशी आहे प्रक्रिया

दोनशे लीटर पाण्याच्या ड्रममध्ये डिकम्पोजर आणि दोन किलो गुळ मिसळायचा. ते मिश्रण पाच दिवस दोनवेळा ढवळायचे. त्याचे २०० लीटर द्रावण तयार होते. यातील ५० लीटर द्रावण दुसर्‍या १९५ लीटर पाण्यात टाकून ही सातत्याने प्रक्रिया करू शकतो. या द्रावणमध्ये कोटयवधी बॅक्टेरिया तयार होतात. ते कचरा खाण्याचे काम करतात. हे पाणी कचर्‍यावर शिपंडले जाते. या कचर्‍यात झाडे लावली जाणार आहेत. ती झाडे पूर्णपणे कचरा खावून टाकतात अशी ही प्रक्रिया आहे.

केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या अंतर्गत काम करणारी गाझीयाबाद येथील राष्ट्रीय जैविक शेती केंद्र या संस्थेच्या माध्यमातून शून्य कचरा मोहीम हा पायलट प्रोजेक्ट राबविला जात आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येत असून मंगळवारपासून त्याची सुरूवात झाली आहे. राष्ट्रीय जैविक शेती केंद्राचे वैज्ञानिक किशनचंद्रा यांनी हे वेस्ट डिकम्पोजर तयार केले आहे. देशी गाईच्या शेणापासून काढलेले तीन प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. त्यापासून हे वेस्ट डिकम्पोजर बनविण्यात आले आहे. त्याची किंमत अवघी २० रूपये आहे. त्यामुळे खर्चही कमी आहे.
– श्रीनिवास घाणेकर , जागरूक नागरिक संघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -