घरमुंबईविकेन्डला मु्ंबईसह उपनगरांमध्ये पावसाची जोरदार एण्ट्री

विकेन्डला मु्ंबईसह उपनगरांमध्ये पावसाची जोरदार एण्ट्री

Subscribe

मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई आणि परिसरात काही ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली असून या सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील लोकल वाहतूकीला बसण्यास सुरूवात झाली आहे. तसेच, रेल्वे वाहतूकीसह रस्ते वाहतुकीवर देखील याचा परिणाम होत आहे.

पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस होणार असे हवामान खात्याने शुक्रवारीच सांगितले होते. येणारे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला असून पश्चिम किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईसह किनारपट्टी भागात शनिवार आणि रविवारी काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार असे  सांगण्यात आले होते, त्या अंदाजाप्रमाणे हा पाऊस कोसळत असून नागरिकांची तारांबळ उडवत आहे.

- Advertisement -

मुंबईतल्या लोकलसेवेववर परिणाम

ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ ते ३ मध्ये पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. तर, मुंबईतल्या हार्बर, सेंट्रल आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरची वाहतूक १० मिनिटे उशिराने सुरु आहे.


मान्सून अलर्ट : पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

काल रात्रीपासूनच ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून अंधेरी, विक्रोळी, घाटकोपर, कांजूरमार्ग परिसरात देखील पावसाचा जोर वाढून कायम आहे. पालघर तालुक्यालाही पावसाने चांगलेच झोडपले असून विरार पूर्व, नालासोपारा स्टेशन परिसर, गाला नगर, तुळींज रोड, सेंट्रल पार्क, अचोळे रोड येथे पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

पहाटेपासून पावसाची दमदार हजेरी

मुंबई शहर आणि उपनगरांत शनिवारी पहाटेपासून पावसाची दमदार हजेरी लावल्याने मुंबई उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली भागात यासह मुंबईत फोर्ट, लालबाग, परळ येथेही पावसाची संततधार कालपासून आहे.

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून पडणाऱ्या पावसाची तीव्रता लक्षात घेता ठाणे जिल्हाधिकारी यांनी सर्व शाळा कॉलेजला सुट्टी दिली असून, त्याचप्रमाणे नागरिकांनीसुद्धा शक्यतो घराबाहेर पडू नये. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. 
– पोलीस उपायुक्त झोन ३

मुंबईसह कोकणातही पाऊस

कोकणात हवामान खात्याने किनारपट्टी भागात हाय अलर्ट जारी केला असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून मुंबईकर आणि पुणेकरांची पाण्याची समस्या कमी झाली असे म्हणता येईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -