घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; गोदावरीची पूरपातळी वाढली

जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; गोदावरीची पूरपातळी वाढली

Subscribe

धरणांतून विसर्ग वाढवला; दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, नदीकाठच्या गावांसह रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

मध्यरात्रीपासून जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून विशेषतः पाणलोट क्षेत्रातील संततधारेमुळे गोदावरीच्या जलपातळीत वाढ झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले असून पावसाचा जोर कायम राहिल्यास पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मागील दोन दिवसांपासून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून करण्यात येणारा विसर्गही कमी करण्यात आला होता. शुक्रवारी सकाळपर्यंत गंगापूर धरणातून साडेतीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता, दुपारनंतर मात्र ७ हजार ८०० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. दोन दिवसांपूर्वी गंगापूरमधून ९ हजार क्युसेक, दारणा धरणातूनही १३ हजार १२४ क्युसेक विसर्ग करण्यात आला. गंगापूर, दारणा धरण क्षेत्रातील पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यात जमा होते, तेथून पुढे हे पाणी जायकवाडीकडे मार्गस्थ होते. नांदूरमध्यमेश्वरमधून सायंकाळी ३८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सकाळपर्यंत हा विसर्ग ३५ हजार क्युसेकपर्यंत करण्यात येत होता. होळकर पूलाखालूनही ९ हजार ४६९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्याबरोबरच शहर परिसरातून वाहून येणार्‍या लहान-मोठ्या नाल्यांचे पाणीही गंगेला येऊन मिसळल्याने पातळी वाढली आहे. गोदाकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून शुक्रवारी दिवसभरात गंगापूर धरण परिसरात ४० मि.मी., कश्यपी २१ मि.मी., गौतमी २८ मि.मी., त्र्यंबकेश्वर ५३ मि.मी., आंबोली ७८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. १ जून ते आजपर्यंत जिल्ह्यात ७६१.११ मि.मी. म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ७५.११ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

- Advertisement -

मालेगाव, सटाण्याचा पाणीप्रश्न सुटणार

चणकापूर धरण ६३, तर हरणबारी धरण ८४ टक्के भरल्याने मालेगाव, देवळा, सटाणा तालुक्यांतील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. यंदा उन्हाळ्यात मालेगावमध्ये सर्वाधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.

धरणांतील विसर्ग असा…

गंगापूर – ७८००
आळंदी – ६८७
पालखेड – १५०२
दारणा – १३१२४
भावली – ९४८
मुकणे – २४१
नांदुरमधमेश्वर – ३८१७७
पुनद – ५३४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -