घरमुंबईदेवनार डम्पिंग ग्राउंडवरील हायमास्ट तीन वर्षातच कमकुवत

देवनार डम्पिंग ग्राउंडवरील हायमास्ट तीन वर्षातच कमकुवत

Subscribe

सभोवताली उभारणार 210 वीजेचे खांब

देवनार डम्पिंग ग्राउंडवर अवघ्या दोन ते तीन वर्षांपूर्वी लावण्यात आलेले हायमास्ट कमकुवत बनून मोडकळीस आले आहेत. हायमास्ट बंद असल्याने पुन्हा एकदा देवनार डम्पिंग ग्राउंडवर काळोख पसरला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डम्पिंग ग्राऊंडवर विजेचे दिवे बसवण्यात येणार आहेत. ९ मीटर उंचीचे 210 विजेचे खांब सर्व परिसरात बसवले जाणार आहेत.

देवनार डम्पिंग ग्राऊंड येथील कुंपणाच्या बाजुला विद्युत रोषणाई करण्यासाठी विजेच्या खांबाचा पुरवठा करण्यासंदर्भातील प्रस्ताव मागील स्थायी समितीच्या बैठकीत आला असता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी आक्षेप घेतला होता. याठिकाणी आधीच हायमास्ट बसवण्यात आले होते. तर मग विद्युत रोषणाईच्या दिव्यांची गरज काय, अशी विचारणा त्यांनी केली होती. यावर खुलासा करताना घनकचरा व्यवस्थापन विभागाने याठिकाणी ९ हायमास्ट बसवण्यात आले होते. परंतु हे हायमास्ट डम्पिंगच्या अंतर्गत भागात बसवले आहे. परंतु कचर्‍याच्या सततच्या भरावामुळे ते कमकुवत बनले आहे. काही मोडकळीस आले असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -

डम्पिंगच्या शेजारी कोणतीच विद्युत रोषणाई नाही. त्यामुळे या अंधाराचा फायदा घेत अनेक कचरा वेचक तसेच समाजकंटक आतील बाजुस प्रवेश करतात. प्रसंगी जाळपोळही करतात. हे प्रकार रोखण्यासाठी सुरक्षारक्षक नेमलेले असले तरी विद्युत रोषणाईअभावी त्यांच्यावर रात्रीच्यावेळी कारवाई करताना अडचणी येतात. परंतु हायकोर्टाच्या आदेशानुसार डम्पिंग परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येत असल्याचे यांत्रिक व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता जी.एस. शरीफ यांनी स्पष्ट केले. याअंतर्गत 210 विद्युत खांब ९ मीटर उंचीचे बसवण्यात येणार आहे. 250 वोल्ट्सचे एलईडी लाईटची जोडणी केली जाणार आहे. यासाठी रिलायन्स कंपनीमार्फत 13 वेगवेगळी इलेक्ट्ीक मीटर उपलब्ध करून दिले जात आहे. खाडी लगत असलेल्या कुंपणावर 40 ते50 मीटर अंतरावर हे वीजेचे खांब लावण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -