घरमुंबईHimalaya Bridge : हिमालय पुलाची एस्कलेटर सेवा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून

Himalaya Bridge : हिमालय पुलाची एस्कलेटर सेवा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून

Subscribe

 14 मार्च 2019 रोजी हिमालय पुलाचा मोठा भाग अचानकपणे कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 नागरिकांचा मृत्यू झाला होता तर 33 जण जखमी झाले होते. त्यानंतर या पुलाचा उर्वरित भाग पाडून प्रत्यक्षात काम सुरू होण्यास विलंब झाला होता.

मुंबई : सीएसटी रेल्वे स्थानक व टाइम्स ऑफ इंडिया मुख्य कार्यालय इमारत परिसर यांना जोडणारा हिमालय पूल पादचाऱ्यांसाठी काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आला आहे. मात्र आता ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, दिव्यांग व्यक्ती, महिला यांना या पुलावरून ये- जा करणे सुलभ व्हावे यासाठी टाइम्स ऑफ इंडिया कार्यालयाच्या दिशेने ‘एस्कलेटर’ सेवा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. सध्या ‘एस्कलेटर ‘ उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (Himalaya Bridge Escalator service of Himalaya bridge from second week of March)

14 मार्च 2019 रोजी हिमालय पुलाचा मोठा भाग अचानकपणे कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 नागरिकांचा मृत्यू झाला होता तर 33 जण जखमी झाले होते. त्यानंतर या पुलाचा उर्वरित भाग पाडून प्रत्यक्षात काम सुरू होण्यास विलंब झाला होता. या पुलाचे काम कंत्राटदाराला देण्यावरूनही काहिसा वाद निर्माण झाला होता. प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यानंतर प्रत्यक्ष पुलाची नव्याने उभारणी करण्यात बराच कालावधी गेला. तब्बल 9 कोटी रुपये खर्चून हा पूल नव्याने उभारण्यात आला आहे. 30 मार्च 2023 रोजी हा पूल पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा : Aaditya Thackeray : पक्ष फोडूनही तुमचे 400 पार होणार नाही! आदित्य ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

वास्तविक, सीएसटी रेल्वे स्थानकात मुंबईमधून व मुंबई बाहेरून दररोज सकाळी व सायंकाळच्या कालावधीत नोकरीसाठी ये- जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. या प्रवाशांमध्ये, अनेकजण पोलीस आयुक्तालय, कामा रुग्णालय, मेट्रो थिएटर, पासपोर्ट कार्यालय, झवेरीबाजार, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई महापालिका मुख्यालय, अंजुमन इस्लाम विद्यालय आदी भागात ये- जा करण्यासाठी, सीएसटी रेल्वे स्थानक व टाइम्स ऑफ इंडिया मुख्य कार्यालय इमारत परिसर यांना जोडणाऱ्या हिमालय पुलाचा वापर करतात.

- Advertisement -

हेही वाचा : Rohit Sharma : रोहित शर्माने धोनीला टाकले मागे; 218 दिवसांनी लगावले शतक

मात्र या पुलावरून ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्ती यांना ये- जा करणे सुलभ होत नाही. त्यांना या पुलाच्या पायऱ्या चढणे आणि तेवढ्याच पायऱ्या उतरणे अडचणीचे ठरते. यास्तव, या पुलावर ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्ती यांना ये- जा करणे सुलभ व्हावे यासाठी मुंबई महापालिकेने या पुलाला ‘एस्कलेटर’ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मध्यंतरी त्याचे काम कासवगतीने सुरू होते. मात्र आता लोकसभा निवडणूक जवळ आल्यावर कंत्राटदाराने तातडीने हालचाली करीत हिमालय पुलाला ‘एस्कलेटर ‘ सेवा पुरविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. सध्या वेल्डिंगचे काम सुरू आहे. ‘एस्कलेटर’ चे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ही ‘एस्कलेटर’ सेवा सुरू होईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -