घरराजकारणपनवेलकरांसाठी ६५० कोटींच्या विकासकामांचा 'श्री गणेशा'!

पनवेलकरांसाठी ६५० कोटींच्या विकासकामांचा ‘श्री गणेशा’!

Subscribe

पनवेल- तिसरी मुंबई आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाच्या कुशीत बसलेल्या पनवेल शहर आता मुलभूत सोयी सुविधांनी परिपुर्ण होणार आहे. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून ६५० कोटी रुपये खर्चुन विविध विकासकामे मार्गी लागणार आहे. (Various development works through Panvel Municipal Corporation at a cost of Rs.650 crores) शहरासाठी जलयोजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाचे भूमीपूजन आणि विविध विकासकामांचे भुमीपूजन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी कळंबोलीमधील सेक्टर ११ येथील प्लॉट क्रमांक ६/१ येथे करण्यात आले.


राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नागरी विकास कामाच्या शुभारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे,खासदार श्रीरंग बारणे,आमदार प्रशांत ठाकूर,आमदार गोपीचंद पडळकर,आमदार महेश बालदी,आमदार राम शिंदे,ओबीसी नेते प्रकाश शेंडगे,रमेश शेंडगे,भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी,माजी महापौर कविता चौतमोल,चारुशीला घरत,सीताताई पाटील,माजी सभागृह नेते परेश ठाकूर,माजी नगरसेवक,नगरसेविका,भाजपचे पदाधिकारी,कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर,रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख,अधिकारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

६५० कोटी रूपयांच्या विकासकामांमध्ये ८ कोटी रूपये खर्चून ’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाचे भूमीपूजन, कळंबोली व खारघर नोडमधील विविध रस्त्याचे काँक्रिटीकरण व पुर्नपुष्ठीकरण, महापालिका मुख्यालय लगतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण व उन्नतीकरण, स्वामी नारायण मार्गाचे काँक्रीटीकरण या २३३ कोटींच्या कामाचे त्याच प्रमाणे अमृत योजने अंतर्गत मलनि:स्सारण वाहिन्या व मलप्रक्रिया केंद्र उभारणे या २५७ कोटी आणि १४८ कोटी खर्चुन पाणी पुरवठा वितरण व्यवस्था उभारणी करणो या कामांचे मान्यवरांच्या हस्ते कळ दाबून उद्घाटन करण्यात आले.

 सर्वांत मोठे कामगार प्रशिक्षण केंद्र कळंबोलीत-मंत्री सामंत
जिल्हा नियोजन समिती योजनेच्या माध्यमातून पनवेल पालिकेला शासनाने यावर्षी २६ कोटींचा निधी दिला असून पुढील वर्षी ३६ कोटींचा निधी देण्यात येणार आहे. तब्बल १७०० कोटी खर्चून देशातील सर्वांत मोठे कामगार प्रशिक्षण केंद्र एमआयडीसीच्या माध्यमातून कळंबोलीत उभारले जाणार आहे.अशा विविध माध्यमातून पनवेल परिसराचा विकास शासन करीत असल्याचे मत उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

पनवेल विकासात्मकदृष्टया सुदृढ होईल-मंत्री चव्हाण
पनवेलमध्ये या विविध विकासकामांच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून पनवेलच्या विकासाची सुरुवात झाली आहे. पनवेल परिसरातील प्रलंबित प्रश्न शासन सोडवत आहे. येत्या काळात पनवेल महापालिका विकासात्मकदृष्टया सुदृढ होईल, असे मत सार्वजनिक बांधकाममंत्री आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले.

नवीन महापालिका असताना मनुष्यबळ कमी असते,यंत्रणा कमी असते असे असून देखील पनवेल महानगरपालिका वेगाने काम करत आहे.आंतरराष्ट्रीय विमातळ होण्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका आपले अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न् करते आहे.
-आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा जो विकास होत आहे. त्याचेच प्रतिबिंब पनवेल शहरात पहायला मिळत आहे. महापालिकेकडून एकाच वेळी ६५० कोटींची कामे सुरू होत आहेत.यात कळंबोली,खारघर व पनवेलसह ग्रामीण भागातील कामे आहेत.गटार लाईन, जलयोजना आहेत. महापालिका ज्यांच्यामुळे बनली ते भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्यामुळे या महापालिकेचा जन्म झाला आणि ती आता वेगाने धावू लागली आहे.
-प्रशांत ठाकूर, आमदार पनवेल विधानसभा

कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन महापालिकेने कामे करण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासनाच्या पाठिंब्यामुळे जीएसटीचे अनुदान पालिकेस सुरू झाले असून येत्या काळात अमृत २ योजनेंतर्गत मिळालेल्या भरीव निधीच्या माध्यमातून महापालिकने एसटीपी प्लॅन्टची कामे सुरू केली आहेत. येत्या काळात शंभर टक्के ड्रेनेजची कामे झालेली पनवेल ही महाराष्ट्रातील एकमेव महापालिका होईल.
-गणेश देशमुख, आयुक्त-पनवेल मनपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -