घरमुंबईपॅन आणि आधारकार्ड 'या' तारखेपर्यंत लिंक करा; नाहीतर...

पॅन आणि आधारकार्ड ‘या’ तारखेपर्यंत लिंक करा; नाहीतर…

Subscribe

पॅन आणि आधार क्रमांक ३० सप्टेंबरपर्यंत लिंक केला नाही तर १ ऑक्टोबरपासून तुमचे पॅन कार्ड इन-ऑपरेटिव्ह म्हणजेच निष्क्रिय होणार

पॅन-आधार लिंक करण्याची मुदत ३१ मार्चला संपत होती. मात्र केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार ही मुदत सहा महिन्यांनी म्हणजे ३० सप्टेंबर २०१९पर्यंत वाढवण्यात आली आहे. सीबीडीटीतर्फे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली होती. पॅन आणि आधार क्रमांक ३० सप्टेंबरपर्यंत लिंक केला नाही तर १ ऑक्टोबरपासून तुमचे पॅन कार्ड इन-ऑपरेटिव्ह म्हणजेच निष्क्रिय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

पॅन-आधार लिंक केलं नाहीतर ठरणार इनव्हॅलिड 

याआधी पॅन क्रमांक मुदत दिलेल्या तारखेपर्यंत आधार क्रमांकाशी लिंक केले नाही तर ते इनव्हॅलिड मानले जाईल, असा नियम करण्यात आला होता. याचाच अर्थ तुमच्याकडे पॅन कार्ड नाही असे देखील मानले जाते, तर इन-ऑपरेटिव्ह म्हणजेच जोपर्यंत तुम्ही पॅन कार्ड आधारशी लिंक करत नाहीत, तोपर्यंत ते वापरता येणार नाही. जर तुमचे पॅन कार्ड दिलेल्या मुदतीपर्यंत आधारशी लिंक केले नाही तर ते इनव्हॅलिड ठरणार आहे.

पॅन-आधारशी लिंक करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत

जुलै २०१९ मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये पॅन कार्ड हे आधार कार्डला जोडण्यासंदर्भातील नियमांत बदल करण्यात आले होते, मात्र केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ३१ मार्च २०१९ रोजी पॅन- आधार कार्ड क्रमांकाशी लिंक करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र यासंदर्भातील पॅन-आधार लिंक करण्याचे नियम १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. पॅन-आधार क्रमांक दिलेल्या मुदतीत लिंक केला नाही तर पॅन कार्ड इन-ऑपरेटिव्ह मानले जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -