घरताज्या घडामोडीमुंबईमध्ये वर्षभरात तब्बल 16,360 होर्डिंग जमीनदोस्त; 164 जणांवरोधात गुन्हा दाखल

मुंबईमध्ये वर्षभरात तब्बल 16,360 होर्डिंग जमीनदोस्त; 164 जणांवरोधात गुन्हा दाखल

Subscribe

मुंबईत दरदिवशी राजकीय पक्षांकडून काहीना काही कार्यक्रमाचे होर्डिंग्स लावले जातात. विशेष म्हणजे हे होर्डिंग्स अनधिकृत असून, शहरं विद्रुप झाली आहेत. त्यामुळे मुंबईते होणारे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कारवाईवर जोर दिला आहे.

मुंबईत दरदिवशी राजकीय पक्षांकडून काहीना काही कार्यक्रमाचे होर्डिंग्स लावले जातात. विशेष म्हणजे हे होर्डिंग्स अनधिकृत असून, शहरं विद्रुप झाली आहेत. त्यामुळे मुंबईते होणारे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कारवाईवर जोर दिला आहे. त्यानुसार, वर्षभरात तब्बल 16,360 होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आले आहेत. तसेच, अनधिकृत पोस्टर्स प्रकरणी 164 जणांवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (in Mumbai illegal 16 thousand 360 hoarding vandalized in a year by bmc)

मुंबईत कोणत्याही कार्यक्रमाबाबत रस्त्यांवर पोस्टर लावायचा असल्यास महापालिकेची परवानगी असणे बंधनकारक असते. विशेषत: मुंबईत व्यावसायिक, कंपन्या, शैक्षणिक संस्था, राजकीय पुढारी यांचे कार्यक्रम आणि इतर उपक्रमाच्या जाहिरातींसाठी होर्डिंगला प्राधान्य दिले जाते. हे पोस्टर्स लावण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असते. परंतु परवानगी न घेता अनाधिकृत होर्डिंग लावले जात असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. त्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्स बॅनर्स लावणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या वर्षात महापालिकेने अनधिकृत होर्डिंग्स विरोधात मोहिम राबवत तब्बल 16 हजार 360 होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्सवर कारवाई केली आहे. तसेच, याप्रकरणी 164 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनाधिकृत होर्डिंग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाला जाग आली.

महापालिकेची वर्षभरातील कारवाई

- Advertisement -
  • राजकीय : 4823
  • व्यावसायिक : 1818
  • धार्मिक : 9719
  • एकूण : 16360

कायदेशीर कारवाई

  • बॅनर्स : 658
  • बोर्ड : 303
  • एकूण : 961

भविष्यात अनधिकृत होर्डिंग्सवर ‘अशी’ होणार कारवाई

  • येत्या काळात प्रत्येक होर्डिंगवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक होण्याची चिन्ह आहेत.
  • जेणेकरून त्याच्या परवानगीबाबतची सारी माहिती थेट मोबाईलवर प्रत्येकासाठी जाहीरपणे उपलब्ध होणार आहे.
  • राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंग आणि बॅनरवर आळा घालण्याच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.
  • लवकरच हायकोर्ट याबाबतचे सविस्तर आदेश जारी करणार आहे.
  • महापालिकेकडून होर्डींगच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर, वेब साईटवरही तक्रार दाखल करण्यासाठी पर्याय उपलब्ध असेल.
  • या कारवाईसाठी 26 वाहनं कर्मचाऱ्यांसह तैनात असतील.

हेही वाचा – पनवेलमध्ये रिक्षाने लिफ्ट देतो सांगत तरुणीवर अत्याचार; २ आरोपींना अटक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -