Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन किती सुंदर..! प्रियंका चोप्राच्या मुलीला पाहताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया

किती सुंदर..! प्रियंका चोप्राच्या मुलीला पाहताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा अलीकडे तिच्या मुलीमुळे देखील सतत चर्चेत असते. वर्षभरापूर्वी प्रियंकाच्या मुलीचा जन्म झाला होता. मात्र, तेव्हापासून तिने एकदाही मुलीचा चेहरा सोशल मीडियावर शेअर केला नाही. प्रियंकाचे चाहते तिच्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी खूप उत्सुक होते. दरम्यान, आता प्रियंकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिच्या मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. शिवाय आता तिच्या मुलीचे फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

अभिनेत्री प्रियंका चोप्रा नुकत्याच एक कार्यक्रमामध्ये उपस्थित होती. ज्यात तिचा पती निक जोनसने केविन आणि जो जोनाससोबत हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टारची घोषणा केली. प्रियंकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये निक जोनस स्टेजवर भाषण करत आहे. यावेळी प्रियंका तिच्या मुलीला घेऊन पहिल्या रांगेत बसली आहे. शिवाय थोड्या वेळाने या व्हिडीओमध्ये तिच्या मुलीचा देखील स्पष्ट दिसत आहे. प्रियंकाच्या मुलीचा चेहरा पाहून चाहते खुप खूश झाले आहेत.

- Advertisement -

अमेरिकन गायक निक जोनससोबत झालं लग्न

bfttu87o
2015 मध्ये प्रियंका चोपडाला अमेरिकन गायक निक जोनस याने प्रपोज केले होते, ज्यानंतर दोघं तीन वर्ष एकमेकांना डेट करत होते. 2018 मध्ये जोधपूर येथे दोघांनी मोठ्या धूमधडाक्यात लग्न केलं. 2022 मध्ये प्रियांका आणि निक जोनस  एका मुलीचे आई-वडील झाले प्रियंकाने मुलीचं नाव मालती मेरी असं ठेवलं आहे.

- Advertisement -

हॉलिवूडमध्ये देखील अभिनयाची छाप
प्रियंका चोप्राची नुकतीच ‘द मॅट्रिक्स रिकर्शन’मध्ये दिसली होती. त्यानंतर प्रियांका ‘एंडिंग थिंग्ज टेक्स्ट फोर युन’ आणि ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त प्रियांका बॉलिवूडमध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्ट सोबत फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

 


हेही वाचा :

जगभरातील प्रेक्षकांना अलका याज्ञिक यांच्या गाण्याची भुरळ; टेलर स्विफ्ट, ड्रेक यांनाही टाकलं मागे

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -