घरमुंबईआयटीआय प्रवेशाला राज्यात 3 जूनपासून सुरुवात

आयटीआय प्रवेशाला राज्यात 3 जूनपासून सुरुवात

Subscribe

राज्यभरात १ लाख ३७ हजार जागा उपलब्ध

राज्यातील सरकारी व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया 3 जूनपासून सुरू करण्यात येत आहे. त्यासाठीची प्रवेश पद्धती, नियमावली व कार्यपद्धती असलेली माहिती पुस्तिका सर्व सरकारी व खासगी आयटीआय संस्थांमध्ये त्याच दिवशी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. आयटीआयसाठी राज्यामध्ये तब्बल 1 लाख 37 हजार 300 जागा असून, पुण्यामध्ये सर्वाधिक 28 हजार 432 जागा आहेत. मुंबईमध्ये 19 हजार 832, तर नाशिकमध्ये 26 हजार 900 जागा आहेत. त्यामुळे पुणे, मुंबई व नाशिकमधील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या अनेक संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

राज्यात कुशल मनुष्यबळाचे प्रमाण वाढावे यासाठी आयटीआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येतात. राज्यातील विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे असणारा कल गेल्या काही दिवसापासून वाढला आहे. राज्यामध्ये सरकारी 417 तर खासगी 538 औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. आयटीआयमधून 79 प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येत असून, त्यातील 10वी अनुतीर्ण विद्यार्थ्यांसाठी 11 तर 10 वी उतीर्ण विद्यार्थ्यांसाठी 68 अभ्यासक्रम आहेत. आयटीआयकडून अभियांत्रिकी विषयाचे एक वर्ष कालावधीचे 23 अभ्यासक्रम, दोन वर्षे कालावधीचे 32 अभ्यासक्रम, बिगर अभियांत्रिकी विषयाचे एक वर्षाचे 24 अभ्यासक्रम आहेत. यामध्ये 10 वी अनुतीर्ण विद्यार्थ्यांसाठी 11 तर 10 वी उतीर्ण विद्यार्थ्यांसाठी 68 अभ्यासक्रम आहेत. आयटीआयला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. त्यानंतर त्याला हवा त्या अभ्यासक्रम (ट्रेड)चे ऑप्शन (विकल्प) भरता येणार आहेत. प्रवेशाच्या एकूण 4 फेर्‍या होणार आहेत. त्यानंतर शिल्लक विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी होणार आहे. शासकीय संस्थेतील 100 टक्के प्रवेश याच प्रक्रियेतून दिले जातील तर खासगी आयटीआसाठीचे 80 टक्के प्रवेश या प्रक्रियेतून होणार आहेत, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक अनिल जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

- Advertisement -

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक
♦ ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे – 3 ते 30 जून (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
♦अर्जात दुरुस्ती व अर्ज भरल्यानंतर छापिल प्रत घेणे – 3 ते 30 जून (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
♦ प्रमाणपत्रांच्या तपासणीनंतर शुल्क भरून प्रवेश निश्चित – 6 जून ते 1 जुलै (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)

पहिली प्रवेश फेरी
♦ विकल्प व प्राधान्य सादर करणे – 6 जून ते 1 जुलै (सायंकाळी 7 वाजेपर्यंत)
♦ प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर – 4 जुलै (सकाळी 11 वाजता)
♦ गुणवत्ता यादीबाबत हरकत नोंदवणे – 4 ते 5 जुलै (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
♦ अंतिम गुणवत्ता यादी जाहीर – 9 जुलै (सायंकाळी 5 वाजता)
♦ निवड यादी जाहीर – 10 जुलै (सायंकाळी 5 वाजता)
♦ प्रमाणपत्रे पडताळणी – 11 ते 15 जुलै (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)

- Advertisement -

दुसरी प्रवेश फेरी
– विकल्प व प्राधान्य सादर करणे – 12 ते 16 जुलै (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
– निवड यादी जाहीर – 19 जुलै (सायंकाळी 5 वाजता)
– प्रमाणपत्रांची पडताळणी – 20 ते 24 जुलै (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)

तिसरी प्रवेश फेरी
♦ विकल्प व प्राधान्य सादर करणे – 21 ते 25 जुलै (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
♦ निवड यादी जाहीर – 29 जुलै (सायंकाळी 5 वाजता)
♦ प्रमाणपत्रांची पडताळणी – 30 जुलै ते 2 ऑगस्ट (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)

चौथी प्रवेश फेरी
♦ विकल्प व प्राधान्य सादर करणे – 31 जुलै ते 3 ऑगस्ट (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
♦ निवड यादी जाहीर – 6 ऑगस्ट (सायंकाळी 5 वाजता)
♦ प्रमाणपत्रांची पडताळणी – 7 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)

समुपदेशन फेरी
♦ प्रवेश फेरीत अर्ज सादर न केलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी – 22 जुलै ते 10 ऑगस्ट (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
♦ गुणवत्ता यादी प्रसिद्ध – 13 ऑगस्ट (सायंकाळी 5 वाजता)

शासकीय संस्थांसाठी समुपदेशन फेरी
♦ शिल्लक जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध – 12 ऑगस्ट (सायंकाळी 5 वाजता)
♦ विद्यार्थ्यांनी हजेरी नोंदवावी – 14 ऑगस्ट (सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत)
♦ गुणवत्ता यादी प्रकाशित – 14 ऑगस्ट (सायंकाळी 5 वाजता)
♦ गुणवत्ता यादीनुसार जागा वाटप – 16 ते 18 ऑगस्ट (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
♦ प्रमाणपत्रांची पडताळणी – 16 ते 18 ऑगस्ट (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)

खासगी संस्थामधील प्रवेश
♦ चौथ्या फेरीनंतर रिक्त झालेल्या जागांवर प्रवेश – 10 जुलै ते 31 ऑगस्ट (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)

गतवर्षीच्या तुलने जागा घटल्या
आयटीआय अंतर्गत अभ्यासक्रमासाठी 2019-20 शैक्षणिक वर्षासाठी 1 लाख 37 हजार 300 जागा उपलब्ध आहेत. मात्र गवर्षी हाच आकडा 1 लाख 39 हजार 492 इतका होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल दोन हजार 192 जागा कमी झाल्या आहेत. आयटीआयचा अभ्यासक्रम, जागा व नियम हे नवी दिल्लीतील डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंगमार्फत ठरवण्या येतात. त्यासुनार एनएसक्यूएफकडून सर्व अभ्यासक्रम अपडेट करण्यात आले असून, ते प्रात्याक्षिकांवर आधारित आहेत. एनएसक्यूएफच्या तत्त्वानुसार काही जागा कमी झाल्या असल्याचे आयटीआयकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -