घरमुंबईजे.जे. तील किडनी रॅकेटप्रकरणी तीन सदस्यीय समितीची स्थापना

जे.जे. तील किडनी रॅकेटप्रकरणी तीन सदस्यीय समितीची स्थापना

Subscribe

जे.जे. हॉस्पिटलमधील किडनी रॅकेटप्रकरणी राज्य शासनाने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला चौकशीचे आदेश दिले असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

जे.जे. हॉस्पिटलमधील किडनी रॅकेटप्रकरणी राज्य शासनाने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला चौकशीचे आदेश दिले आहेत. या समितीच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे. समितीद्वारे अहवालाअंती खासगी हॉस्पिटल दोषी आढळल्यास त्वरित कारवाई करुन रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

अवयक प्रत्यारोपणाची प्रक्रिया असते

अवयव प्रत्यारोपणाची परवानगी देण्यासाठी विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती असते. ही समिती अवयवदाता आणि ज्या व्यक्तीला अवयवांची गरज आहे, त्यांच्यासोबत चर्चा करते. दाता आणि ज्या व्यक्तीला अवयव प्रत्यारोपण करण्यात येणार आहे, त्याची मुलाखत घेतली जाते. अवयवदाता हा अवयवाची गरज असलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नात्यातील आहे का नाही? याची चौकशी केली जाते. सर्व बाबी तपासल्यानंतर विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती अवयव प्रत्यारोपणाची परवानगी देण्यात येते.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने किडनी प्रत्यारोपणासाठी पैसे मागितल्याप्रकरणी जेजे रुग्णालयालातील समाजसेवा अधीक्षक तुषार सावरकर आणि रहेजा या खासगी रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण समन्वयक सचिन साळवे याला अटक केली आहे. यासंदर्भातील तपशील विभागाने दिलेले नसले, तरीही राज्य सरकारने या समितीच्या माध्यमातून तातडीने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिरानंदानी हॉस्पिटलचा परवाना रद्द

दोन वर्षांपूर्वी पवईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांवर मूत्रपिंड प्रत्यारोपणासंदर्भात कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपणाचा परवाना रद्द करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -