घरमुंबईकेईएममध्ये रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

केईएममध्ये रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

Subscribe

केईएम रुग्णालयामध्ये रुग्णाला रांगेत ताटकळत ठेवल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या कुटुंबाने केला आहे.

केईएममध्ये उपचारांसाठी मंगळवारी रात्री उशिरा दाखल झालेल्या एका ५२ वर्षीय रुग्णाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. हृदय विकाराच्या रुग्णाला रांगेत ताटकळत ठेवल्याने त्यांचा रांगेतच हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. शिवाय, रुग्णाचे ईसीजी ग्राफ वर खाली होत असताना देखील रुग्णाचे अडीच तास चाचणी करण्यात घालवले असाही आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला असून राम चांदणे असं या रुग्णाचं नाव आहे.

नेमके काय घडले?

राम चांदणे हे दादरच्या नायगांव परिसरात राहत होते. त्यांना अचानक छातीत दुखू लागल्याने एका मित्रासह त्यांनी केईएम रुग्णालय गाठले. रात्री ११.३० च्या दरम्यान केईएम रुग्णालयात दाखल झालेल्या राम चांदणे यांना तपासणीसाठी घेण्यात आले. आणखी एक तपासणी बाकी होती. त्यासाठी त्यांचा मित्र रांगेत उभा होता. तेव्हाच राम चांदणे हे अचानक खाली कोसळले. त्या आधी त्यांचा इसीजी रिपोर्ट काढण्यात आला होता. मात्र ते रिपोर्ट व्यवस्थित नसतानाही चांदणे यांना रांगेत उभं करुन ठेवलं. तसेच त्यांना अडीच तास वैद्यकीय तपासण्यांमध्ये ताटकळत ठेवण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

राम चांदणे यांच्या तपासण्यांची प्रक्रिया सुरू होती. पण, त्यांचा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. तरीही, या प्रकरणातील सर्व कारणांची पडताळणी करण्यात येईल.  – डॉ. अविनाश सुपे, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -