घरमुंबईकासारवडवली ते वडाळा मेट्रो 4 प्रकल्प

कासारवडवली ते वडाळा मेट्रो 4 प्रकल्प

Subscribe

वृक्ष तोडीस उच्च न्यायालयाची स्थगिती

गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा मेट्रो 4 प्रकल्पातील वृक्ष तोडीस स्थगिती दिली. मेट्रो 4 कासार वडवली ते वडाळा या मार्गावर ही स्थगिती लागू राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. याबाबत एमएमआरडीएच्या वकिलाने ही झाडे रस्त्याच्या मध्यभागी असून ती जंगली झाडे नसल्याने ती कापली तर पर्यावरणास कोणताही धोका पोहचत नाही, असा युक्तीवाद केला. त्यास जोरदार आक्षेप याचिकाकर्त्याच्या वकिलांनी घेऊन ही पूर्ण वाढलेली झाडे असून ती कापल्यास मोठा धोका पर्यावरण्यास होईल असा युक्तीवाद केला. याबाबत एमएमआरडीएकडे फोटोही उपलब्ध नसल्याने ही स्थगिती न्यायालयाने दिली.

मेट्रो 4 ही गरजेची आहे पण ती जमिनी खालून करण्यात यावी अशी याचिका ठाणे नागरी प्रतिष्ठान व रोहीत जोशी यांनी केली आहे. या बाबत एमएमआरडीएने त्यांचे उत्तर दाखल केले नाही, हे उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

- Advertisement -

महानगरातील वृक्ष हे महत्वाची नसून विकासाकरता ती केव्हाही कापली जावीत, असे केल्याने पर्यावरणास धोका पोचत नाही, असे विधान एमएमआरडीएचे वकील न्यायालयात कसे करू शकतात? हे एकदा मान्य झाले तर मग शहरे व महानगरे यात वृक्ष लागवडीचे कार्यक्रम दर पावसाळ्यात कशासाठी केले जातात? आम्ही सांगतो तोच विकास हा उद्दामपणा या प्रवृत्तीमागे आहे, याचा स्पष्ट विरोध न्यायालयात व रस्त्यावरही झाला पाहिजे, असे मत ठाणे मतदाता जागरण अभियानाचे अध्यक्ष संजीव साने यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -