घरमुंबईकेडीएमसीच्या नालेसफाईचा फज्जा, ४८ तासांत २०० मिमी पाऊस!

केडीएमसीच्या नालेसफाईचा फज्जा, ४८ तासांत २०० मिमी पाऊस!

Subscribe

रविवारी मध्यरात्रीपासून पडणारा पाऊस सोमवारीही सुरूच असल्याने कल्याण-डोंबिवली शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. गेल्या ४८ तासात कल्याणात सरासरी २०० मिमी पावसाची नोंद झाली. साचलेल्या पाण्यातूनच नागरिकांना मार्गक्रमण करावे लागले. त्यामुळे पहिल्याच पावसाने केडीएमसीच्या नालेसफाईचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी पाणी साचले. त्यामुळे साचलेल्या पाण्यातूनच नागरिकांना मार्गक्रमण करावे लागले. त्यामुळे पहिल्याच पावसाने केडीएमसीच्या नालेसफाईचा दावा फज्जा उडाल्याचे दिसून आले. गेल्या ४८ तासात कल्याणमध्ये सरासरी २०० मिमी पावसाची नोंद झाली. महापालिका क्षेत्रात १३ वेगवेगळया ठिकाणी झाडे कोलमडल्याच्या घटना घडल्या. रविवारी मध्यरात्रीपासून पडणारा पाऊस सोमवारीही सुरूच असल्याने कल्याण-डोंबिवली शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. कल्याण खाडीच्या पाण्याची पातळी वाढल्याने भरतीच्यावेळी सर्तकतेचा इशारा देण्यात आला होता. खाडी परिसरातील गोविंदवाडी येथील म्हशींचे तबेले. झोपड्यातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठया प्रमाणात पाणी साचले होते त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीती पसरली होती. नांदिवली नाला ते सर्वोदय सोसायटी या परिसरात एक ते दीड फूट पाणी साचले होते पाण्यातूनच मार्ग काढत रहिवाशांना जावे लागले.

पालिकेच्या नालेसफाईच्या कामाचे पितळ उघड

कल्याण डोंबिवली महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शिवाजी महाराज चौक आणि पालिकेला लागून असणाऱ्या अत्रे रंगमंदिर परिसरात रस्त्यावर गटाराचे पाणी आले होते त्यामुळे पालिकेच्या नालेसफाईच्या कामाचे पितळ उघडे पडले. तसेच डोंबिवली पश्चिमेतील साई लिला या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील घराचे प्लास्टर पडले. यात कोणत्याही प्रकारची जिवित व वित्त हानी झालेली नाही. कल्याणहून पनवेल मुरबाड आणि नाशिककडे जाणा-या एसटी बससेवेला वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागला. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहने हळू हळू जात होती त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.

- Advertisement -

येथे साचले पाणी ..

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील शिवाजी चौक, अत्रे रंगमंदिर, पत्रीपूल, उंबर्डे, चिकणघर येथील दत्तमंदिर परिसर, व्हर्टेक्स कॉम्पलेक्स, फोर्टीज रूग्णालय, बल्याणी गाव डोंबिवलीत महात्मा फुले रोड, टिळक चौक., लोटेवाडी , आजदे, सागाव, आडीवली-ढोकळी, नांदिवली, तिसगांव येथे पाणी साचले होते.

एमआयडीसीत पाईपलाईन फुटली

मिलाप नगर मधील मोठया नाल्याच्या संरक्षण भिंतीला तडा पडल्याने तेथील पाण्याची पाईप लाईन फुटली त्यामुळे मिलाप नगरपरिसरातील रस्त्यावर पाणी साचले होते. दुपारचा सत्रातील काही शाळांना सुट्टी देण्यात आली. एम्स हॉस्पिटल, मिलापनगर तलाव रोड, ग्रीन्स स्कुल, वंदेमातरम उद्यान, सुदर्शन नगर मधील साईबाबा मंदिर रोड, साईसृष्ठी सोसायटी, बद्रीनाथ सोसायटी इत्यादी ठिकाणे पाणी साचले होते. तसेच कल्याण शीळ रस्त्यावरील लोढा हेवन कॉम्पलेक्स मध्ये पाणी साचले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -