घरमुंबईपालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच अवयवदान

पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच अवयवदान

Subscribe

दोन वर्षांनी पुन्हा केईएममध्ये अवयवदान सुरू

मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच अवयवदान पार पडलं. दोन वर्ष बंद असलेल्या पालिका हॉस्पिटलच्या अवयवदानाच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. ५२ वर्षीय माले हे गृहस्थ काही दिवसांपूर्वी केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. घरी अचानक स्ट्रोक आल्यामुळे या व्यक्तीला केईएममध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण, रुग्णाची प्रकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करतानाच नाजूक होती. त्यामुळे, उपचारादरम्यान दोन एप्निया तपासण्या केल्यानंतर काही त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आलं. या रुग्णाच्या नातेवाईकांना अवयवदानाबाबत माहिती असल्याकारणाने नातेवाईकांनी अवयवदानाला पुढाकार घेतला आणि केईएम हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा अवयवदान पार पडलं.

या रुग्णाचे किडनी आणि यकृत हे दोन अवयव दान केले आहेत. पण, अवयव प्रत्यारोपण समितीच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, किडनी प्रत्यारोपणासाठी योग्य नसल्याचे सांगण्यात आले. तर, दान केलेलं यकृत अपोलो हॉस्पिटलमध्ये दान करण्यात आलं आहे. साताऱ्यातील एक गृहस्थ गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या प्रतिक्षेत होते. त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपण केलं गेलं आहे.

- Advertisement -

सार्वजनिक हॉस्पिटलच्या प्रमुख हॉस्पिटलपैकी महत्त्वाचं मानलं जाणाऱ्या केईएम हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच अवयव दान करण्यात आलं आहे. गेली २ वर्षे काही कारणास्तव हा विभाग बंद होता. पण, अखेर हा विभाग सुरू झाल्याने महापालिकेच्या हॉस्पिटलमध्येही अवयवदान मोठ्या प्रमाणात होण्यास चालना मिळणार आहे. या रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयवदानाबाबत सकारात्मकता दाखवल्याने हे अवयवदान यशस्वीरित्या पार पडलं. शिवाय, अवयव दानाबद्दल अधिक जागरुकता वाढवण्यासाठी आणखी प्रयत्न गरजेचे असल्याचं मत व्यक्त केल्याचं केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -