घरताज्या घडामोडीराहुल गांधींच्या आश्वासनाची पुर्तता करा, मिलिंद देवरांचे सोनिया गांधींना पत्र

राहुल गांधींच्या आश्वासनाची पुर्तता करा, मिलिंद देवरांचे सोनिया गांधींना पत्र

Subscribe

काँग्रेसने जनतेला दिलेली वचने महाविकास आघाडीच्या सरकारने पुर्ण करण्याबाबत मिलिंद देवरा यांचे पत्र

मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचे आव्हान कायम असतानाच सध्या मुंबई काँग्रेस एका पत्राने घयाळ झाली आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी थेट राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना हे पत्र लिहले आहे. या पत्राने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नवी धुसफूस सुरु झाली आहे. देवरा यांनी लिहलेल्या पत्रात महाराष्ट्र विकास आघाडीने काँग्रेसतर्फे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकी दरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करुन देण्याची आठवण करुन दिली आहे. त्यामुळे या पत्रामुळे सध्या नवी चर्चा सुरु झाली आहे.

राज्यात काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेसचे राहुल गांधी यांनी मुंबईत परवडणाऱ्या घरांची घोषणा केली होती. त्याचा उल्लेख काँग्रेसतर्फे त्यांच्या वचननाम्यात देखील करण्यात आले होते. आता महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वांचे लक्ष या घोषणेकडे लागून राहिले आहे. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर अद्याप या घोषणेबाबत कोणत्याही हालचाली सुरु न झाल्याने माजी खासदार मिलिंद देवरा यांनी हे पत्र राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहल्याचे कळते.

- Advertisement -

या पत्रात त्यांनी महाविकास आघाडी राज्यात चांगले काम करीत आहे. मात्र काँग्रेसकडून आश्वासनांची पूर्तता लवकर करण्यात यावी. केंद्रात काँग्रेसची सत्ता न आल्यामुळे लोकसभेला दिलेल्या आश्वासनाला ब्रेक लागला होता. परंतु राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसचा सहभाग असल्याने या आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे आता तरी काँग्रेसकडून या घोषणेबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, देवरा यांच्या या पत्रामुळे सध्या मुंबई काँग्रेसमधील नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. देवरा यांनी थेट दिल्ली दरबारी याबाबत पत्र लिहल्याने अनेकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. मिलिंद देवरा हे राहुल गांधी आणि गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे देवरा यांच्या मागणीवर सोनिया गांधी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. मात्र मुंबईतील लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरांनी जुलै महिन्यात राजीनामा दिला होता.

- Advertisement -

दरम्यान, या पत्राबाबत बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, सरकारची समन्वय समिती स्थापन झाली, मुख्यमंत्री समितीचे अध्यक्ष आहेत प्रत्येक पक्षाचे दोन मंत्री समितीत आहेत. त्यामुळे किमान समान कार्यक्रमानुसार सरकारचे काम सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून निवडणूक लढवली होती दोन्ही पक्षांनी एकच संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यामुळे आम्ही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सुरु आहे. कर्जमाफीचा निर्णय झाला आहे. अल्पदरात भोजन देण्याची योजना सुरु झाली आहे. काम होत आहेत. देवरांना वाटलं असेल पत्र लिहावं त्यांनी पत्र लिहिले, त्यांनी आम्हाला विचारलं तर त्यांना वस्तुस्थिती समजवून सांगू, असे थोरातांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

काय केली होती घोषणा

काँगेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ मुंबईतून करताना, काँगेसचे सरकार आल्यानंतर मुंबईतील भाडेकरुंना हक्काचे ५०० चौ.फूट घर आम्ही देवू अशी घोषणा केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -