घरमुंबईट्रेनमध्ये #KiKiChallenge पडले भारी; शिक्षा स्थानकाची सफाई

ट्रेनमध्ये #KiKiChallenge पडले भारी; शिक्षा स्थानकाची सफाई

Subscribe

ट्रेनमध्ये किकी चॅलेंज करणाऱ्या तीन तरुणांना न्यायालयाने एक आगळीवेगळी शिक्षा सुनावली आहे. या तरुणांचा किकी चॅलेंज करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस यांच्या शोधात होते. पण, अखेर या तिघांवर कारवाई करत पोलिसांनी त्यांना विरारमधून अटक केली आहे. 

जगभरातील तरुणाईला वेड लावलेल्या किकी चॅलेंजने भारतातील तरूणाईलाही भूरळ पाडली आहे. सोशल मीडियावर एकामागून एक व्हिडियोतून या चॅलेंजची धूम पाहायला मिळत होती. विरार स्थानकातील ट्रेनमध्येही तीन तरूणांकडून किकी चॅलेंज करण्यात आले. या तीन तरूणांना पोलीसांनी अटक केली असून त्यांना एक आगळी वेगळी शिक्षा सुनावली आहे.

काय सुनावली शिक्षा ? 

या मुलांनी आता रेल्वे स्थानकांमध्ये स्टंट करणं कसं धोकादायक आहे? याचा प्रचार करावा. तसंच, रेल्वे स्थानकाची सफाई करावी, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सतत तीन दिवस त्यांना हे काम करावं लागणार आहे. पोलीसांनी या तरूणांना ही एक वेगळी शिक्षा सुनावली असल्यामुळे सर्वत्र या शिक्षेची चर्चा होत आहे.

- Advertisement -

कोण होते हे तरुण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर लोकल ट्रेनमध्ये किकी चॅलेंज पूर्ण केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पश्चिम रेल्वेच्या आरपीएफने विरारमधून निशांत (२०), ध्रूव शाह (२३) आणि श्याम शर्मा (२४) या तिघांना बुधवारी (८ ऑगस्ट) अटक केली. ध्रूव शहा आणि त्याच्या दोन मित्रांनी हा व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओत एक तरुण लोकलमधून खाली उतरतो आणि प्लॅटफॉर्मवर डान्स करायला लागतो. त्यानंतर पुन्हा तो धावत्या लोकलमध्ये चढताना दिसत आहे. पश्चिम रेल्वेने या व्हिडिओची दखल घेत कारवाईचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या आरपीएफचे विभागीय आयुक्त अनूप शुक्ला यांनी किकी चॅलेंजचा व्हिडिओ समोर येताच तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं. खबरींच्या मदतीने तरुणांबद्द्ल माहिती मिळताच पोलिसांनी तिघांसाठी सापळा रचला आणि बुधवारी त्यांना अटक केल्याची माहिती दिली.

हेही वाचा – ‘किकी चॅलेंज’ची स्टंटबाजी पोलिसांसाठी ठरतेय डोकेदुखी!

किकी चॅलेंजसारखे प्रकार धोकादायक असून असे चॅलेंज कुणाच्याही जीवावर बेतू शकते. तसंच अन्य तरूणही याचं अनुकरण करतील आणि तरूणांचा जीव धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त होत होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेने या व्हिडिओची दखल घेत कारवाईचा निर्णय घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -