घरमुंबईमहाराष्ट्रात सर्वाधिक मोठे पार्किंग ठाण्यात

महाराष्ट्रात सर्वाधिक मोठे पार्किंग ठाण्यात

Subscribe

मल्टिलेव्हल पार्किंगची क्षमता 2 हजार 500 वाहांनापेक्षा जास्त

महाराष्ट्रात रेल्वेचे सगळ्यात मोठे मल्टिलेव्हल पार्किंग आता ठाणे रेल्वे स्थानकावर सुरू होणार आहे. या पार्किंगमध्ये प्रवाशांना वाहने ठेवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होणार आहे. हे पार्किंग अत्याधुनिक असणार आहे. तसेच या पार्किंगमध्ये वाहनांची क्षमता 2 हजार 500 पेक्षा जास्त असेल. यातून रेल्वेला एक कोटी 56 लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे.

नोकरीच्या निमित्ताने लोकलने दररोज प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या ठाणे रेल्वे स्थानकांत फार मोठी आहे. मात्र अपुर्‍या पार्किंग व्यवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाकडे पार्किंगसाठी जागेचा तुटवडा नाही. केवळ योग्य व्यवस्थापनाचा अभाव असल्याने रेल्वे पार्किंगचे तीन तेरा वाजले होते. त्यामुळे अत्याधुनिक पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून प्रवाशांच्या पार्किंगचा प्रश्न रेल्वे प्रशासनाने सोडवावा,अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्यानुसार रेल्वेनी 2019 मध्ये मध्य रेल्वेनी उपनगरीय छोट्या- मोठ्या रेल्वे स्थानकात 2019 मध्ये एकूण 21 पार्किंग सुरू करण्यात आली आहे.आता तर ठाणेकरांसाठी एक अत्याधुनिक मल्टिलेव्हल पार्किंग ठाणे रेल्वे स्थानकावर सुरू होणार आहे. ही मध्य रेल्वेची सर्वाधिक मोठी पार्किंग आहे. तसेच महाराष्ट्र रेल्वेची सर्वाधिक मोठी पार्किंगचा मान सुध्दा आता ठाणे रेल्वे स्थानकाला मिळणार आहे. रेल्वेने या पार्किंग चालविण्यासाठी खासगी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. तसा करार सुध्दा मध्य रेल्वेशी झाला आहे. मध्य रेल्वेला या मल्टिलेव्हल पार्किंगमधून वार्षिंक एक कोटी 56 लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. तसेच प्रवाशांना वाहन ठेवण्याची अडचण सुध्दा मल्टिलेव्हल पार्किंगपासून दूर होणार आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वेवर आता 57 पार्किंग
उपनगरीय लोकलचा विस्तार आणि रेल्वे स्थानकांवरील गर्दीही वाढली आहे. साधारणत: रेल्वे स्थानकांपासून दहा ते पंधरा मिनिटांपर्यंतच असलेली लोकवस्ती आता वाहनाने ३० ते ४५ मिनिटांचा प्रवास करू लागण्याइतकी लांब गेली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी आपली बाईक, कार घेऊन रेल्वे स्थानकापर्यंत येतात. मात्र अनेक रेल्वे स्थानकांबाहेर वाहन पार्क करण्यासाठी पार्किंग स्थळ नसल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होते. तसेच खाजगी पार्किंग स्थळांवर अव्वाच्या-सव्वा पैसे उखळले जात असल्यामुळे नेहमी तेथे हातघाईची परिस्थिती असते. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आपल्या 2019 मध्ये 21 रेल्वे स्थानकांबाहेर पार्किंग स्थळे उभारली आहेत.

ठाण्यामधून सर्वाधिक महसूल
मध्य रेल्वे मार्गांवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाची ओळख आहे. मध्य रेल्वेचा प्रवासी संख्येचा आढावा घेतला असता ठाणे स्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत गेली आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहन पार्किंग करण्यासाठी रेल्वेने मल्टिलेव्हल पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यात 2 हजार 500 पेक्षा जास्त वाहने पार्क करू शकता येणार आहे. मध्य रेल्वेला सर्व पार्किंगमधून मिळणार्‍या महसुलापैकी ठाणे रेल्वे स्थानकातून सर्वाधिक महसूल मिळणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दै.आपलं महानगरला दिली आहेत.

- Advertisement -

मध्य रेल्वेवर पहिल्यांदाच मल्टिलेव्हल पार्किंग ठाणे रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर वाहन घेऊन येणार्‍या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच मध्य रेल्वेला यातून महसूलसुध्दा मिळणार आहे.
-ए.के. जैन, मध्य रेल्वे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी

अशी आहे प्रवासी संख्या
•२०१५-१६  २ लाख ३६ हजार
•२०१६-१७  २ लाख ४७ हजार
•२०१७-१८  २ लाख ५८ हजार
•२०१८- १९  २ लाख ६२ हजार

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -