घरमुंबईLok Sabha 2024 : चंद्रशेखर बावनकुळेंच्या ठाकरेंवरील टीकेला अंबादास दानवेंचे प्रत्युत्तर

Lok Sabha 2024 : चंद्रशेखर बावनकुळेंच्या ठाकरेंवरील टीकेला अंबादास दानवेंचे प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल, सोमवारी सोलापुरातील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. तर आता, ठाकरे गटाचे नेते, आमदार अंबादास दानवे यांनी बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोमवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. टरबूजाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. टरबूज हे उन्हाळ्यात कामी येते. पण हे (देवेंद्र फडणवीस) टरबूज नाहीत, ते दिवाळीत पायाखाली चिरडले जाणारे चिराटे आहेत. आले तेव्हा मुख्यमंत्री होते, पण आता पाव उपमुख्यमंत्री झाले, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर शरसंधान केले होते.

- Advertisement -

भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांचा पुन्हा तोल गेलाच. उद्धव ठाकरे यांनी कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद फडणवीस यांच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आता एक लक्षात ठेवावे की, तुम्ही मोदी आणि फडणवीस यांच्याबद्दल कितीही वायफळ बडबड करा. 4 जून रोजी जनता तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही, असा दावा त्यांनी केला.

- Advertisement -

त्याला आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्यु्त्तर दिले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत कॅबिनेट मंत्री असतानाही फडणवीस, नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी तिकीट कापले होते, हे बावनकुळे विसरले का? असा खोचक सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे. घर आणि पक्ष फोडणाऱ्या फडणवीस यांच्यावर टीका करायला काय हरकत आहे? त्यांची आरती ओवाळायची का? अशी टीका त्यांनी केली आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : दासबोधाचा आधार घेत चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -