घरमुंबईशिधावाटप दुकानात मिळणारे मीठ निकृष्ट - मनसेचा आरोप

शिधावाटप दुकानात मिळणारे मीठ निकृष्ट – मनसेचा आरोप

Subscribe

उल्हासनगर शहरातील काही शिधावाटप दुकानात मिळणारे मीठ हे निकृष्ट दर्जाचे असून त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

‘उल्हासनगर शहरातील काही शिधावाटप दुकानात मिळणारे मीठ हे निकृष्ट दर्जाचे असून त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता’ असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या संदर्भात एक लेखी निवेदन शिधावाटप कार्यालयात दिला आहे. शिधावाटप दुकानांमध्ये सध्या इतर मिठांच्या तुलनेने स्वस्त मिळणाऱ्या मीठाविरोधात मनसेने आवाज उठवला आहे. भिवंडी येथील एका कंपनीचे मीठ हे पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही आणि विशिष्ट प्रकारच्या रंगाचा थर पाण्यावर जमा होतो. त्यामुळे हे मीठ निकृष्ट प्रतीचे असून त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असल्याचा आरोप मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी केला आहे.

मिठाचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई

मिठाचा दर्जा तपासावा तसेच मिठाचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदार आणि कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत शिधावाटप कार्यालयाचे अधिकारी सानप यांना प्रदीप गोडसे, शहराध्यक्ष बंडू देशमुख, जिल्हाध्यक्ष सचिन कदम, उपजिल्हा सचिव संजय घुगे आणि इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितत यांना तक्रारीचे लेखी निवेदन देण्यात आले आहे. उल्हासनगर विभाग शिधा अधिकारी सानप यांना या संदर्भात विचारले असता ते म्हणाले ही सदर कंपनीच्या मिठाबाबत काही तक्रारी अगोदर प्राप्त झाल्या होत्या , त्याची शहानिशा करण्यासाठी टाटा कंपनीच्या लॅब मध्ये या मिठाची तपासणी करण्यात आली तेव्हा हे मीठ खाण्यायोग्य असून त्यात कोणतेही हानिकारक तत्व आढळून आलेले नाही.

- Advertisement -

हेही वाचा – पती निकसोबत स्मोकिंग केल्यावर ट्रोल झाली देसी गर्ल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -