घरमुंबईमहानगर इम्पॅक्ट : हार्बर लाईनवरही गणेशभक्तांसाठी विशेष लोकल

महानगर इम्पॅक्ट : हार्बर लाईनवरही गणेशभक्तांसाठी विशेष लोकल

Subscribe

मुंबई : मुंबईतील गणपतींचे दर्शन घेण्यासाठी हजारो गणेशभक्त रात्रभर फिरत असतात. गणेशभक्तांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने १८ ते २३ सप्टेंबर दरम्यान विशेष लोकलगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हार्बर मार्गावर विशेष लोकलगाड्या सुरू नव्हत्या. परिणामी हार्बर मार्गावरील गणेशभक्तांची गैरसोय होत होती. याबाबत ‘आपलं महानगर’ने वृत्त दिल्यावर बुधवारी रेल्वे प्रशासनाने तातडीने हार्बर लाइनवरही रात्री विशेष लोकल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला.

हार्बर मार्गवरही आता मध्य रेल्वेकडून १९ ते २३ सप्टेंबर दरम्यान ४ विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. त्यातील शेवटची गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री 1.30 वाजता सुटणार असून पनवेल येथे पहाटे २.५० वाजता पोहोचेल. त्यामुळे आता हार्बर लाईनवरील गणेशभक्तही लालबागचा राजासह अन्य गणपतींचे दर्शन घेऊ शकणार आहेत.

- Advertisement -

गणेश दर्शनासाठी मध्यरात्री प्रवास करणार्‍या प्रवाशांना घरी परतणे सुलभ व्हावे, याकरिता रेल्वेकडून मध्य रेल्वे मार्गावर विशेष लोकलगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या पाठोपाठ आता हार्बर मार्गावरसुद्धा बुधवारपासून विशेष लोकलगाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-ए.के.जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -